Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?
Saam TV August 09, 2025 08:45 AM
  • बिल्लाळी गावातील एका म्हैशीला कुत्र्याने चावल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

  • या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

  • एकूण १८२ लोकांनी रेबीजच्या लसीसाठी रुग्णालयात रांग लावली.

  • आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवून घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं.

कुत्रा चावल्यानंतर म्हैस दगावल्याने गावातील गावकऱ्यांना थेट रुग्णालयाच रस्ता पकडावा लागलाय. गावातील १८२ लोकांनी लस घेण्यासाठी रुग्णालयात रांग लावल्यीच घटना नांदेड जिल्ह्याततील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात घडली. नेमकं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याच झालं असं या गावातील एका म्हैशीला कुत्रा चावला होता. त्यानंतर म्हैशीचा मृत्यू झाला. त्यानंतर रेबीज होण्याच्या भीतीने गावातील लोकांनी रुग्णालयात लस घेण्यासाठी रांग लावली.

Solapur News : नाव राधा, किंमत साडेतीन लाख; बुटक्या म्हशीची ऐट बघितली का?|VIDEO

पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हैसदगावल्याची घटना घडली. मात्र म्हशीचा मृत्यू होण्यापूर्वी तिचं दूध गावातील अनेक घरात वितरित झाले होतं. त्या दुधाचा वापर चहा आणि अन्य पदार्थांत झाला होता. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं गावातील १८२ जणांना रेबीजची लस देण्यात आली आहे.

Buffalo Attack On Students: शाळेत रेड्याचा धुमाकूळ; मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांवर रेड्याचा हल्ला| Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार,बिल्लाळी गावात राहणारे किशन दशरथ इंगळे यांच्या म्हशीला कुत्र्याने बऱ्याच दिवसापूर्वी चावा घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हैस अचानक आजारी पडली होती. कुत्राचावल्याची लक्षणे उशिरा समजल्याने वेळेत ५ ऑगस्ट रोजी म्हैस दगावली. पण मृत्यूपूर्वी तिचं दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होतं. जवळजवळ १८० लोकांनी या म्हैशीचे दूध चहा आणि इतर पदार्थातून प्राशन केलं होतं. त्यांना रेबीजची लस देण्यात आलीय.

येवती गावातील -९८

राजुरा गावातील - २५

बाराळी गावातील- १९

देगलूर गावातील- १०

बिल्लाळी गावातील- ३०

असे एकूण १८२ लोकांना रेबीजची लस देण्यात आलीय. दरम्यान आरोग्य विभागाचे पथक गावात तळ ठोकून आहे. म्हशीला रेबीज झाला असेल म्हणून आम्हाला होईल, ह्या भीतीने लोकांनी लस घेतल्याची माहिती डॉ. प्रणिता गव्हाणे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.