लातूर : सध्या सणासुदीचे दिवस असून याकरिता नारळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पण, यावर्षी नारळाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती आहे. याचा परिणाम नारळ, शहाळे, खोबरे, खोबरे तेल या सर्वांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे.
प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात नारळाला मोठी मागणी होती. कोट्यवधी भाविक या मेळ्यात सहभागी झाले होते. यात नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सध्याही सणासुदीचे दिवस आहेत. यातदेखील नारळास मोठी मागणी आहे. काही महिन्यांपूर्वी २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाचा भाव ३० ते ३५ रुपयांच्या घरात गेला आहे.
नारळ पाण्याला (शहाळे) मोठी मागणी आहे. रुग्णाला हे पाणी देण्यासोबतच आरोग्य चांगले राहावे म्हणूनदेखील नागरिक नारळ पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. २५ ते ३० रुपयांना मिळणारे हे शहाळे आता ६० ते ७० रुपये दराने विकले जात आहे. तरीदेखील त्याला मागणी आहे.
खोबऱ्यासह तेलाचा भावही वधारलादेशात नारळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे खोबऱ्याचादेखील तुटवडा जाणवत आहे. दीड-दोनशे रुपये किलो मिळणाऱ्या खोबऱ्याचा (काळी पाठीचे) ठोक भाव आता तीनशे रुपयांच्या घरात गेला आहे. तर पिवळ्या पाटीच्या खोबरे २६० रुपये किलो दराने विकले जात आहे. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक भाव आहे; तसेच खोबऱ्याचे भाव वाढल्याने खोबरे तेलाचा भावही वधारला आहे. सध्या पाचशे ते ५६० रुपये किलो खोबरेल विकले जात आहे. एकूणच सणासुदीच्या दिवसांत नारळ, खोबरे, तेलाच्या भावात वाढ झाली आहे. देशभरातून नारळ पाण्याची मागणी वाढत आहे. येथे आंध्र प्रदेश व कर्नाटकातून शहाळे येते. त्यात कर्नाटकातील शहाळ्याचे पाणी गोड आहे. त्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. ५० ते ५६ रुपये प्रतिनग शहाळे विकले जात आहे. किरकोळ भाव ६० ते ७० रुपये आहे.
मलेशियातून खोबऱ्याची आवक बंद झाली आहे. आपल्याकडे आंध्र प्रदेश व तामिळनाडूमधून नारळ येते. त्यात नारळाचे उत्पादन कमी आहे. नारळ पाणी पिण्याचा वापर तीस टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे नारळाच्या किमतीत वाढ झाली आहे. ठोक भाव दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये आहे.
— पद्माकर जाधव,
नारळाचे ठोक विक्रेते
Godavari Accident: गोदावरी नदीत पडून ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधकार्ययावर्षी नारळाचे उत्पादन कमी व मागणी जास्त आहे. त्यामुळे सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काळ्या व पिवळ्या पाठीच्या खोबऱ्याचे भाव वाढले आहेत. काळ्या पाठीच्या खोबऱ्याचा भाव ४०० रुपयांपर्यंत गेला होता. आता तो तीनशे रुपयांपर्यंत खाली आला आहे. भाव चढ-उतार होत आहेत.
— श्रीरंग मद्रेवार,
ड्रायफ्रूट्स विक्रेते