Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर महावतार नरसिंहाने मारली बाजी; 'सैयारा', 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'चा गेम ओव्हर
Saam TV August 09, 2025 06:45 PM

Box Office Collection: लोकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या जॉनरचे अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. एकीकडे 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' सारखे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर आहेत. तर, दुसरीकडे 'महावतार नरसिंह' आणि 'किंगडम' सारखे दक्षिणेतील चित्रपटही आहेत. आता जाणून घेऊया शुक्रवारी या चित्रपटांनी कितीची कमाई केली.

'महावतार नरसिंह' कलेक्शन

महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या या पहिल्या चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही त्याने नवा विक्रम केला. देशात १०० कोटी रुपये कमावणारा हा पहिला अॅनिमेशन चित्रपट ठरला आहे. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे 'महावतार नरसिंह'च्या एकूण ११८.१५ कोटी कमाईपैकी ८७.४० कोटींचा व्यवसाय फक्त हिंदीमध्ये झाला आहे.

सैयारा

अहान पांडे आणि अनित पड्डा अभिनित आणि मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटाने २२ व्या दिवशी १.२ कोटी कलेक्शन केले आहे. त्याचा एकूण कलेक्शनही आतापर्यंत ३०९.९५ कोटींवर पोहोचला आहे. 'सैयारा'ने या वर्षी प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची सोशल मिडीयावर अजूनही चर्चा असून येत्या काळात हा चित्रपट आणखी कमाई करु शकेल.

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप
View this post on Instagram

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

'सन ऑफ सरदार २'

गुरुवारी बॉक्स ऑफिसवर फक्त १.४० कोटी कमाई करणाऱ्या 'सन ऑफ सरदार २'चे आता शुक्रवारीचे कलेक्शन जाहीर केले आहे. अजय देवगणच्या चित्रपटाने शुक्रवारी आठव्या दिवशी फक्त ६० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. हे कलेक्शन त्याच्या गुरुवारच्या कलेक्शनच्या निम्मे आहे, अशाप्रकारे, 'सन ऑफ सरदार २' आठ दिवसांत फक्त ३३.६० कोटी कमाई करू शकला आहे.

Raksha Bandhan Gift: या राखीपौर्णिमेला लाडक्या बहिणीला द्या ही खास भेटवस्तू, आजचं करा खरेदी
View this post on Instagram

A post shared by Ahaan Panday (@ahaanpandayy)

'धडक २'

दुसरीकडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक २' हा चित्रपट आणखी वाईट स्थितीत आहे. तथापि, सोशल मीडियावर या चित्रपटाचे हळूहळू कौतुक होत आहे. परंतु त्याचे पडसाद कमाईत दिसून येत नाही. 'धडक २' ने गुरुवारी १.१० कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या आठवड्यात, देशात त्याने १६.७० कोटी रुपये कमावले आहेत, तर जगभरातील एकूण कलेक्शन २३.५० कोटी रुपये आहे. शाझिया इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट सुमारे ५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.