नाशिक: भगत वस्ती, रेंज रोड, वडनेर येथे चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ८) रात्री आठला घडली. आयुष किरण भगत (वय ४) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वन विभाग व पोलिसांच्या तीन तासांच्या शोधकार्यानंतर थर्मल ड्रोन व श्वानपथकाच्या सहाय्याने त्याचा मृतदेह उसात सापडला.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घराबाहेर आयुष बसलेला असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला करीत त्यास फरफटत नेले. मुलगा दिसत नसल्याचे पाहून आजूबाजूला पाहिले असता त्याची रक्ताने भरलेली पँट दिसली. हे पाहून त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला. या वेळी परिसरातील नागरिक या ठिकाणी एकत्र आले.
Pune Traffic : सिग्नल यंत्रणेत सुधारणा; पुणे महापालिकेच्या एटीएमएस प्रणालीमुळे वाहतूक कोंडी कमीघटना समजतात वन विभाग व पोलिस यांचा मोठा ताफाही या ठिकाणी दाखल झाला. तसेच, माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार व विक्रम कोठुळे यांच्यासह जवळपास एक हजार नागरिक उपस्थित होते. सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट, उपनिरीक्षक विशाल सपकाळे, प्रभाकर सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला. थर्मल ड्रोन व श्वानपथकाच्या सहाय्याने युद्धपातळीवर मुलाचा शोध घेत रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. त्याचा मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.