मोठी बातमी! मंडल यात्रेला शरद पवार हजर, जयंत पाटील मात्र अनुपस्थित, चर्चांना उधाण
Tv9 Marathi August 10, 2025 07:45 AM

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा आजपासून नागपूर मधून सुरु झाली आहे. या यात्रेला पक्षाचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते. मात्र या यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आता त्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा विविध चर्चा रंगल्या आहेत.

नागपूरमध्ये शरद पवार यांच्या हस्ते या मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी जयंत पाटील उपस्थित होते. समोर आलेल्या माहितीनुसार जयंत पाटील हे वसंतदादा साखर संघाच्या बैठकीसाठी पुण्यात होते, त्यामुळे ते या यात्रेच्या शुभारंभाला उपस्थित राहु शकले नाहीत. मात्र तरीही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या यात्रेची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले X वर पोस्ट करत म्हटले की, “देशात मंडल आयोग लागू करण्याविरोधात भूमिका घेत भाजपाने कमंडल यात्रा काढली, परंतु देशात पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याचं काम मुख्यमंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी केलं. पण सध्या ओबीसींना घाबरवण्याचं काम सध्या सुरु असून भाजपाचा खरा चेहरा लोकांपुढं आणण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्यावतीने राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली आहे. नागपूरमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते या ‘मंडल यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

देशात मंडल आयोग लागू करण्याविरोधात भूमिका घेत भाजपाने कमंडल यात्रा काढली, परंतु देशात पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याचं काम मुख्यमंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी केलं. पण सध्या ओबीसींना घाबरवण्याचं काम सध्या सुरु असून भाजपाचा खरा चेहरा लोकांपुढं आणण्यासाठी ‘राष्ट्रवादी… pic.twitter.com/ukZCdWdXey

— Rohit Pawar (@RRPSpeaks)

यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, हर्षवर्धन देशमुख, खा. अमर काळे जी, ज्येष्ठ नेते राजेंद्र शिंगणे साहेब, रमेश जी बंग, सलील देशमुख, गुलाबराव गावंडे, मा. आ. प्रकाश गजभिये, शरद दादा तसरे, मा. आ. चरणभाऊ वाघमारे, सुनील गव्हाणे यांच्यासह पक्षाच्यावतीने ‘मंडल यात्रे’ची जबाबदारी असलेले मा. राज राजापूरकर तसंच स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते.

पुढील 40 दिवस राज्यातील 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यात 14 हजार 877 कि.मी. प्रवास करणार आहे. या प्रत्येक ठिकाणी ‘मंडल यात्रे’चं स्वागत करण्याची आणि या यात्रेच्या माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका, भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे आणि त्याचा कसा राजकीय फायदा उठवला जातो हे लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रत्येकाची आहे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.