करोडपती बनण्याचा फॉर्म्युला सापडला, पैसे बँकेत ठेवण्याऐवजी 'या' ठिकाणी करा गुंतवणूक
Tv9 Marathi August 10, 2025 10:45 AM

आपण सर्वजण करोडपती बनण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. योग्य माहिती, योग्य गुंतवणूक आणि संयमाने, कमी उत्पन्न असणारी व्यक्ती करोडपती बनू शकते. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुंतवणूक लवकर सुरु करा

करोडपती बनण्यासाठी तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्यावा लागेल. कारण यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर देखील परतावा देखील देते, यामुळे पैसे जलद वाढतात. यासाठी तुम्हाला शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 5,000 हजारांची गुंतवणूक सुरू केली आणि तुम्हाला 12% वार्षिक परतावा मिळाला तर तुम्ही तुम्ही 50 व्या वर्षापर्यंत करोडपती बनू शकता.

गुंतवणूकीत सातत्य

करोडपती बनण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीत सातत्य असणे महत्वाचे आहे. यासाठीतुम्हाला दर महिन्याला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल. यामुळे बाजारातील चढ-उतारांमध्येही तुम्हाला चांगला फायदा होतो.

जोखीम आणि परतावा

गुंतवणूकीवर जास्त परतावा मिळविण्यासाठी जोखीम घेणे गरजेचे आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदार असलेले तरुण गुंतवणूकदार जास्त जोखीम असलेल्या इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. तर अल्पकालावधीसाठी गुंतवणूक करणारे लोक कमी-जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करु शकता.

कुठे करायची गुंतवणूक म्युच्युअल फंड आणि एसआयपी

म्युच्युअल फंडांद्वारे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात आणि ते शेअर बाजार, बाँड किंवा इतर ठिकाणी गुंतवले जातात. सासाठी तुम्हाला दरमहा एसआयपी करावी लागेल. म्हणजेच दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवावी लागेल. तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 10 हजारांची एसआयपी केली आणि तुम्हाला 12 % परतावा मिळाला तर तुम्ही 24 लाख रुपये गुंतवूण 1 कोटी रुपये मिळवू शकता.

शेअर बाजार

शेअर बाजारातील कंपन्यांचे शेअर्स थेट खरेदी आणि विक्री करु शकता, यात जास्त जोखीम आहे, मात्र यातून परतावाही चांगला मिळतो. योग्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. मात्र यासाठी बाजाराचा अभ्यास असणे आवश्यक आहे. यात माहितीशिवाय गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते.

रिअल इस्टेट

तुम्ही जमीन, घर किंवा व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. मात्र यासाठी जास्त निधीची आवश्यकता असते. मालमत्तेच्या मूल्यात वाढ झाल्याने आणि नियमित भाड्याच्या रुपात तुम्हाला उत्पन्न मिळू शकते. तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर रिअल इस्टेटमधून मोठा नफा मिळू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.