लग्न झाल्यानंतर एक मुलगी आपल्या नवऱ्याची पत्नी होते. मात्र तिला या पक्त एकाच नात्याची जबाबदारी पार पाडायची नसते. तिच्यावर सून, भावजई अशा अनेक नात्यांच्या जबाबदाऱ्या असतात. या सर्वच नात्यांना सोबत घेऊन तिला पुढे जावे लागते. मात्र या सर्व नात्यांमध्ये पतीनंतर तिचा सर्वाधिक संबंध येतो तो सासू या नात्याशी. आजकाल बहुतांश घरात सासू आणि सूनेत भांडण झाल्याचे आपण पाहतो.
अनेक घरात तर सासू आणि सून एकमेकांना बोलतही नाहीत. मात्र सासू-सूनेचं हे नातं मरेपर्यंत कायम राहतं. त्यामुळे या नात्याला जेवढं चांगल्या पद्धतीने फुलवता येईल, तेवढं फुलवायला हवं. सूनांनी सासूपुढे या तीन गोष्टींचा कधीच उल्लेख करू नये. हा नियम पाळल्यास सासू ही तुमची दुसरी आईदेखील होऊ शकते.
तुमच्या सासूला तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवलं असं कधीच म्हणू नका. सासूपुढे या शब्दांचा उल्लेख केला तर भांडणं होण्याची शक्यता असते. नंतर सासू-सूनेच्या नात्यात वितुष्टही येऊ शकतं. त्यामुळे सूनांनी सासूला तुम्ही मुलाला काहीच शिकवलं नाही, असा टोमणा मारू नये..
तुमच्या पतीने काही चूक केली असेल तर त्याला तुमच्या सूनेला कधीच दोषी ठरवू नका. किंवा तुमच्या पतीची चूक कधीच तुमच्या सूसाला सांगू नका. कारण असे केल्यास सासू तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो नवऱ्यासोबतचे भांडण सासूला सांगू नये.
सासू कधीकधी रागात असेल तर उलट-सुलट उत्तरं देऊ नयेत. सासूचा राग शांत झाला की सूनांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि तोडगा काढावा. कारण तुम्हीही सासूवर राग काढला तर चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असतो. त्यामुळे शांततेत प्रश्नांची उत्तरं शोधावीत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)