शरद पवार इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसलेत, बड्या नेत्याची टीका!
Tv9 Marathi August 11, 2025 11:45 AM

Laxman Hake : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणारे लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, अशी बोचरी टीका हाके यांनी केली आहे. जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. ते साताऱ्यात बोलत होते.

सांगायचे एक आणि करायचं एक असे…

निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत. ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात. जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारे त्याचे आंदोलन उभं करणारे अशी शरद पवार यांची ओळख आहे. आज तेच ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा सुरू करत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला

शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ओरखडून खाल्ला

तसेच, जरांगे पाटील यांनी लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसींचे पंचायत राजमधील आरक्षण असो किंवा शिक्षण क्षेत्रातील आरक्षण असो, सगळे उद्ध्वस्त केले आहे. या मंडल यात्रेमागचा नेमका उद्देश काय आहे. मंडल आयोगाच्या 38 योजनांपैकी दोन योजना भारतीय व्यवस्थेत लागू झाल्या आहेत. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ओरखडून खाल्ला जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणाला किंमत दिली नाही. इच्छाधारी नागाप्रमाणे शरद पवार वेटोळे घालून बसले आहेत, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.

शरद पवार हे दगेबाज नेते

ओबीसींमध्ये फुट कशी पाडायची, फोडा आणि जोडा हे शरद पवार यांचे राजकारण आहे. शरद पवार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागतात. महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचं अंतकरण समजून घ्यायला हवं होतं. त्यांनी निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजून घेतले आहे. शरद पवार हे दगेबाज नेते आहेत, अशी टीकाही हाके यांनी केली. तसेच अशा दगाबाज नेत्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहनही हाके यांनी ओबीसी समाजाला केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.