डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे निघणार दिवाळे, अर्थव्यवस्थेला बसेल धक्का, विश्लेषकांच्या मतांनी खळबळ
GH News August 11, 2025 02:15 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लागून भारताला मोठा धक्का दिला. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. हेच नाही तर काही देशांनी भारताला पाठिंबा दिलाय. अमेरिकेतील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी न मानण्यास सांगितले आहे.अमेरिका भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. टॅरिफ विरोधात अमेरिकेतही संतापाचे वातावरण सध्या बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेवर मोठे कर्ज आहे आणि ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचा धोका वाढला आहे. यामुळे अमेरिकेतही खळबळ उडालीये. मूडीज विश्लेषकांच्या मते, वाढती महागाई, नोकऱ्या, बाजार आणि धोरणात्मक आव्हाने यामुळे आर्थिक स्थिरता डळमळीत झाली आहे. मुळात म्हणजे 90 टक्के अमेरिकन लोक हे सततच्या अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीमुळे चिंतेत आहेत. अमेरिकेत घरभाडे ही एक दुसरी मोठी चिंता आहेच. या सर्व गोष्टीमध्ये आता ट्रम्प यांनी टॅरिफ लावलाय.

अमेरिकेत मंदीचा धोका अधिक वाढलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या वेळी सांगितले होते की, ते महागाई कमी करतील, मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाहीये. उलट अमेरिकेत महागाई वाढलीये. सर्वेनुसार, अन्नधान्याचे वाढते भाव आणि घराचा किराया ही अमेरिकेतील लोकांसमोर मोठी समस्या आहे. अमेरिकेत लोक खरेदी करत आहेत आणि नंतर पैसे देण्याच्या सेवांवर अवलंबून आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीमुळे अमेरिकेतील लोकांचेही दिवाळे निघू शकते.

सर्वेनुसार, अमेरिकेत आता लवकरच प्रत्येक गोष्टींची किंमत वाढणार आहे. ज्या दैनंदिन जीवनात लागतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीमुळे अमेरिकेतील कार व्यवसायावर देखील मोठा परिणाम झालाय. कार कंपनींनी यावर थेट बोलण्यास सुरूवात देखील केलीये. टॅरिफमुळे कार कंपनीचे उपन्न धोक्यात येऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ निती ही त्यांच्यावरच भारी पडण्याची दाट शक्यता आहे. भारत ट्रम्प यांच्या दबावाखाली झुकणार नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, जोपर्यंत यावर निर्णय होणैार नाही, तोपर्यंत भारतासोबत चर्चा होणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.