रक्षाबंधनानिमित्त गोवंडी पोलिसांना बांधल्या राख्या
चेंबूर, ता. १० (बातमीदार) ः जनतेकरिता अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना राखी बांधून आनंद द्विगुणित करावा, या हेतूने संत गाडगे महाराज एक चळवळ संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून गोवंडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थितांना व्यसन सोडण्याची शपथ देण्यात आली. याप्रसंगी अनिता महाडिक, मीनाक्षी देशमुख, यमुना मुळीक, अर्चना रेगोडे, डॉ. राजकुमार वाघमोडे, प्रकाश डांगे, विजय कांबळे व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.