आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनिती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना प्रेरणा देतो. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा मानवाच्या रोजच्या जीवनाशी संबंध येतो. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? पैसा कुठे आणि कसा खर्च करावा? याबाबत देखील त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे.
चाणक्य यांनी घर बांधताना काय काळजी घ्यावी? घर कुठे खरेदी करू नये? घर कुठे खरेदी करावं? तुम्ही जिथे घर बांधणार आहात ती जागा कशी असावी याबाबत देखील मार्गदर्शन केलं आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
चाणक्य म्हणतात तुम्ही जिथे घर बांधतात किंवा जिथे वास्तव्याला असतात, त्या परिसराचा, तेथील लोकांचा तुमच्यावर परिणाम होतं असतो. त्यामुळे घर बांधत असताना आपणं घर नेमकं कुठे बांधत आहोत? जी जागा आपल्यासाठी योग्य आहे का? याचा विचार आवश्य करावा.
चाणक्य पुढे म्हणतात अशा जागेवर चुकूनही घर बांधू नका, जिथे तुमच्यासाठी रोजगार नसेल. कारण तुम्हाला जर नोकरी मिळाली नाही तर तुम्ही घर तर बांधाल मात्र ते चालवण्यासाठी संसारासाठी तुम्हाला पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे चुकूनही अशा ठिकाणी घर बांधू नका, जिथे रोजगार नसेल.
शिक्षण- चाणक्य म्हणतात चांगलं शिक्षण हाच मानवाच्या विकासाचा पाया असतो, त्यामुळे जिथे चांगलं शिक्षण मिळणार नाही, अशा ठिकाणी आपलं घर नसावं, शिक्षणामुळेच मानवाची प्रगती होते. माणूस रोजगारासाठी सक्षम बनतो, त्यामुळे अशाच ठिकाणी घर बांध जिथे शिक्षणाच्या सोई उपलब्ध असतील, तसेच जिथे आरोग्याच्या सोई नसतील आणि सज्जन लोक नसतील अशा ठिकाणी घर बांधू नये असं चाणक्य म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)