Father-Son Relationships: किशोरावयानंतर मुले वडिलांपासून दूर का होतात? जाणून घ्या तज्ज्ञांच्या मते 5 कारणं
esakal August 10, 2025 05:45 AM

थोडक्यात:

१. किशोरवयात वडील मानसिकदृष्ट्या अनुपस्थित राहिल्यास मुलं दुरावतात.

२. सतत उपदेश, टीका आणि तुलना मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम करतात.

३. वेळ न देणं आणि संवादाची कमतरता नात्यात दुरावा निर्माण करते.

Father Son Communication Gap: लहानपणी वडिलांसोबत वेळ घालवणं, खेळणं, मन मोकळं करणं याला प्राधान्य देणारी मुलं... जेव्हा किशोरवयात प्रवेश करतात, तेव्हा त्यांचं वागणं बदलताना दिसतं. आधी जिथं संवाद असे, तिथं आता शांतता असते. वडिलांशी बोलणं कमी होतं, अंतर वाढतं. बर्याच वेळा पालकांना वाटतं की, हे नैसर्गिक बदल आहेत. मुलं मोठी होतात, त्यांचं स्वतंत्र आयुष्य तयार होतंय.

पण तज्ज्ञांच्या मते हे इतकं सरळ नाही. NLP (Neuro-Linguistic Programming) प्रॅक्टिशनर अवनी सांगतात की, या वयात मुलं वडिलांपासून का दुरावतात, याची अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे वडील "शारीरिकदृष्ट्या जवळ असूनही मानसिकदृष्ट्या अनुपस्थित" असणं. चला तर मग, जाणून घेऊया अशी पाच कारणं, जी किशोरवयीन मुलांना त्यांच्या वडिलांपासून हळूहळू दूर नेतात

Raksha Bandhan: भावालाच नाही, देवांनाही राखी बांधा आणि मिळवा त्यांच्या कृपेचा आशीर्वाद! "उपलब्ध" नसणं

वडील घरी असतात, पण ते कायम मोबाइलमध्ये, कामात किंवा त्यांच्या विचारांत मग्न असतात. अशावेळी मुलांना वाटतं की, त्यांचं ऐकून घेणारं कुणीच नाही. त्यामुळे ते हळूहळू वडिलांशी बोलणं टाळतात.

संवादाची कमतरता

किशोरवयात मुलं खूप प्रश्न विचारतात, पण जर प्रत्येक संवाद "शिकवण्या" आणि "उपदेश" या रूपात असेल, तर ती चर्चा होऊ शकत नाही. मुलांना हवं असतं, कुणीतरी त्यांना निःसंकोच ऐकावं निर्णय दिला जावा असं नाही.

तुलना आणि टीका

इतर मुलांशी तुलना करणं, सतत चुका दाखवणं किंवा त्यांची मतं खोडणं हे सर्व किशोरांच्या मनावर खोल परिणाम करतात. त्यांना वाटतं की, त्यांची कधीच प्रशंसा होणार नाही. परिणामी, ते वडिलांपासून दूर जातात.

भावनात्मक अनभिज्ञता

वडील जर मुलांच्या भावनांना गांभीर्याने घेत नाहीत, किंवा त्यांच्या दुःखाला “काही नाही, होतं असं कधी कधी” म्हणत दुर्लक्षित करतात, तर मुलं मन मोकळं करणं बंद करतात. हे आतल्या आत तणाव निर्माण करतं.

वेळ न देणं

दिवसभराचं काम, ताण, जबाबदाऱ्या यामध्ये वडील मुलांसाठी वेळच देत नाहीत, तर नातं कुठे रुजणार? मुलं नात्यांना देखील ‘रिस्पॉन्स’ देतात. जेव्हा त्यांना वेळ आणि प्रेम मिळतं, तेव्हाच ते ओपन होतात.

Two Faced Rudraksha: दोनमुखी रुद्राक्ष म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आध्यात्मिक रहस्य आणि आरोग्यदायी फायदे FAQs

1. किशोरवयीन मुले वडिलांपासून का दूर जातात? (Why do teenage children drift away from their fathers?)

वडील शारीरिकदृष्ट्या उपस्थित असले तरी मानसिकदृष्ट्या अनुपस्थित असतात, संवादाची कमतरता आणि भावनिक दुर्लक्ष यामुळे दुरावा निर्माण होतो.

2. वडिलांनी मुलांशी चांगलं नातं टिकवण्यासाठी काय करावं? (What should fathers do to maintain a good bond with their children?)

वेळ द्या, ऐका, संवाद साधा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा हे नातं टिकवायला मदत करतं.

3. मुलांशी तुलना केल्यास काय परिणाम होतो? (What is the impact of comparing children with others?)

तुलना केल्यास मुलं न्यूनगंडाने ग्रस्त होतात आणि पालकांपासून दुरावतात.

4. किशोरवयात संवाद का महत्त्वाचा असतो? (Why is communication important during teenage years?)

या वयात मुलांना मार्गदर्शनापेक्षा ऐकणं आणि समजून घेणं अधिक हवं असतं, ज्यामुळे ते भावनिकदृष्ट्या जवळ राहतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.