पंचांग -
शनिवार : श्रावण शुद्ध १५, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.०२ सूर्यास्त ७.०२, चंद्रोदय सायंकाळी ७.१८, चंद्रास्त सकाळी ६.२८, रक्षाबंधन, ऋक् शुक्ल यजुः, हिरण्यकेशी, तैत्तिरीय श्रावणी, अश्वत्थ मारुती पूजन, अगस्ती दर्शन, पौर्णिमा समाप्ती दु. १.२५, भारतीय सौर श्रावण १८ शके १९४७.
दिनविशेष -
२००३ - आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरवपदकासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांची निवड.
२००५ - अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचे (नासा) डिस्कव्हरी अवकाशयान कॅलिफोर्नियातील एडवर्डस् हवाई तळावर ‘एसटीएस’ मोहीम आटोपून सुरक्षितरीत्या उतरले.
२००७ - ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.