संमतीने सगळं झालं असेल तर…एकनाथ खडसे यांचे जावयाबद्दल थेट मोठे विधान, एका मुलीने तरी…
Tv9 Marathi August 09, 2025 09:45 PM

पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला पोलिसांनी रंगेहात पकडले. ज्यानंतर राज्याच्या राजकारणत भूकंप आला. रूपाली चाकणकर यांनी एक पत्रकार परिषद घेत नाथाभाऊंच्या जावयाबद्दल धक्कादायक खुलासे केली. आता नुकताच एकनाथ खडसे यांनी यावर भाष्य केले. एकनाथ खडसे म्हणाले की, मी पहिल्याच दिवशी सांगितले आहे की, जावयाच्या समर्थन करणार नाही, जर तो चुकीचा असेल तर. कोर्टामध्ये सिद्ध होईल. पण या संदर्भामध्ये जे काही रूपालीताई चाकणकर बोलत आहेत, त्यावर काहीतरी आधार पाहिजे की नाही?

पुढे खडसे यांनी म्हटले की, एक मुलीनं यावं…आणि म्हणावं माझ्या लैगिंक छळ झाला, माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार झाला, जबरदस्तीने माझे फोटो काढले, मला डांबून ठेवलं..अशी एकतरी तक्रार यावी. संमतीने झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये काय सांगू शकता? मग जर कोणाची तक्रारच नसेल तर… मी काही समर्थन करत नाही, कायद्यानुसार ते खासगी आहे. हा जर ते जबरदस्ती झालं असेल तर सगळ्या गोष्टी पुढे येतात. हे असेल संमती असेल किंवा कोणतेही असेल हे करणे गैर आहे, घातक आहे.

कोणत्याही महिलेने म्हटले नाही की, माझ्यावर बळजबरी झाली, माझ्यावर बलात्कार झाला, या क्षणापर्यंतही पोलिसांकडे ते आले नाही. व्हाया रूपालीताई या माध्यमातून हे वारंवार काढतात. माझा यात काय संबंध आहे? आहे जावई आता…पण मी काय जावयाला सांगितलं असं कर…? रोहिणीताईने सांगितले असं कर? मग उगाच जावई…रोहिणीताई…आता तुमचे जावई घरात काय करतात…तुमचा मुलगा घराच्याबाहेर गेल्यावर काय करतो…दारू पितो का की…अजून काही. शेवटी बाहेर गेल्यावर तो त्याच्या खासगी प्रश्न आहे.

आम्ही त्याला (प्रांजल खेवलकर) सांगत नाही की, बाबा बाहेर जाऊन डग्स घे…पोरींना बोलाव…हे काय नाथाभाऊंनी शिकवलंल नाहीये. उगाच राजकारणासाठी नाथाभाऊंना बदमान करण्यासाठी लोढा विषयातून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. जावयाच्या रेव्ह पार्टीबद्दल पहिल्यांदाच थेट बोलताना एकनाथ खडसे हे दिसले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.