नवी मुंबई (वार्ताहर) : वाशी सेक्टर-२९ मधील श्री गुरुवाय रफ्पल मंदिरातील पुजेसाठीचे पितळ्याचे साहित्य चोरण्यात आले आहे. वाशी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
वाशी सेक्टर-२९ मध्ये श्री गुरुवाय रफ्पल मंदिर आहे. या वेळी पुजेसाठी लागणारे गोल पितळी ताट, हवनासाठी लागणारे चमचे, एक छोटी समई, आरती करण्याचे पात्र, एक दिवा, दोन पात्र असे साहित्य मंदिर व्यवस्थापनाने बाहेर काढून ठेवले होते. या वेळी पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश करून साहित्य चोरण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.