मोशी, ता. ९ : ‘‘स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण होय. प्रत्येक आईने बाळाला स्तनपान करणे म्हणजे भविष्यात त्याच्या निरोगी शरीरासाठी मोठी गुंतवणूक करण्यासारखेच आहे.’’, असे प्रतिपादन स्तनपानाचे महत्व व जागरुकता या विषयावरील स्त्री व प्रसूती तज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोशी दवाखाना व रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्यावतीने स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी डॉ. गायकवाड बोलत होत्या.
यावेळी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली ढोणे, भोसरी रूग्णालय प्रमुख डॉ. ऋतुजा लोखंडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, रोटरी क्लब डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष डॉ. संतोष मोरे, माजी अध्यक्ष दीपक सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी गरोदर स्तनदा मातांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोशी दवाखान्यातील जेष्ठ परिचारिका, ज्योत्स्ना बधे, शामल गोसावी तसेच मोशी झोनच्या आशा वर्कर्स, सर्व कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी सप्ताहानिमित्त रांगोळी, पोस्टर प्रदर्शन व स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे सचिव डॉ. योगेश गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर नोडल अधिकारी डॉ. विकल्प भोई यांनी आभार मानले.
MOS25B03818