प्रत्येक शहराप्रमाणे या भागातही शिकवणी वर्ग, क्लासेसची संख्या अधिक आहे. नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असलेला हा भाग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. या भागातील विविध घरांमध्ये मुलांचे हॉस्टेल, मुलांसाठी रूम किरायाने देण्यात येतात. अनेक कुटुंब चाकरमानी असल्याने जो तो त्याच्या कामात गुंतलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील गटार आणि सीवर सातत्याने चोकअप होत होतं. गटार तुंबत होतं. लोकांनी तक्रारी केल्यानंतर मग सफाई कर्मचारी आले. त्यांनी दोन-तीन ठिकाणी सीवरवरील ढापे बाजूला सारले, जेव्हा त्यांनी सर्व कचरा, घाण बाहेर काढली, तेव्हा सर्वांचेच डोळे विस्फारले. गटार तुंबण्याचे कारण समोरच येताच नागरिकांनी डोक्याला हात मारून घेतला.
काय झाले?
हा प्रकार लुधियानातील ताजपूर रस्त्यावरील संजय गांधी नगर परिसरातील आहे. येथे सतत गटार तुंबत होते. सीवरेज चोकअप होत होते. नागरिकांनी तक्रार केली. त्यानंतर सफाई कर्मचारी आले. त्यांनी ढापे उघडले आणि आतील कचरा बाहेर काढला. त्यावेळी कर्मचाऱ्यांना पण करावे नी काय नाही असे झाले. कारण यामध्ये कंडोमचा ढीग साचला होता. वापरलेल्या कंडोमचा मोठा ढीग पाहुन नागरिकांना पण काय बोलावे ते सूचेना.
मग नागरिकांनी सर्वच घरातील विद्यार्थ्यांना एकत्र केले. त्यांच्यासमोर हा कंडोमचा ढीग होताच. त्यावेळी अनेकांनी कानावर हात ठेवले. दुपारी आणि रात्रीच्या वेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना रूमवर बोलवत असल्याचे समोर आले होते. नागरिकांनी मग या विद्यार्थ्यांना याचा जाब विचारला. तुम्ही शिकण्यासाठी येता की दुसरे काम करण्यासाठी, असा सवाल विचारण्यात आला. काही नागरिकांनी या वापरलेल्या कंडोमच्या ढिगाचे फोटो काढले आणि पोलिसांमध्ये तात्काळ तक्रार करुन विद्यार्थ्यांना या परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे रहिवाशी आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
तर काही घर मालकांनी सरसकट सर्वांना दोषी धरणे योग्य नसल्याचे म्हटले. सर्वच विद्यार्थी असे काही करत नाहीत. जिथे होस्टेल आहे, तिथेच असे प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर स्थानिकांनी होस्टेल चालकाशी संपर्क केला. त्याने असे प्रकार होत नसल्याचे म्हटले. नागरिकांनी मग पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजते.