पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 10 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. केएसआर बेंगळुरू-बेळगाव आणि माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेसलाही त्यांनी आज हिरवा झेंडा दाखवलाय. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसची मागील काही दिवसांपासून सतत प्रवाशांकडून मागणी केली जात होती. शेवटी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
नागपूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूरच्या लोकांना मोठा आनंद झालाय. कारण त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे, शिवाय 60 दिवस अगोदर रिर्झेवेशन काढण्याचे टेन्शन देखील नसणार आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर नागपुरकरांनी थेट म्हटले की, ही वंदेभारत एक्सप्रेस आमच्यासाठी एखाद्या बुलेट ट्रेनपेक्षा कमी नक्कीच नाहीये.
नागपूरच्या लोकांनी वंदेभारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर म्हटले की, आम्ही या एक्सप्रेसला बुलेट ट्रेनच म्हणणार आहोत. ही ट्रेन केवळ वेळ वाचवणार नाही तर आरामदायी आणि आनंदी प्रवास देखील देईल. या वंदेभारत एक्सप्रेसचा फायदा कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ लोकांना होणार आहे. हेच नाही तर एक्सप्रेसच्या उद्धाटनाला नागरिक मोठ्या संख्येने पोहोचले होते.
या वंदेभारत एक्सप्रेसची सर्वात खास बाब म्हणजे या ट्रेनचे सहज तिकिट मिळणार आहे. आरामदायी प्रवासासोबतच 16 तासांचा प्रवास 10 तासांत पूर्ण होईल, त्यामुळे आमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असे नागपूरच्या लोकांचे म्हणणे आहे. ही वंदेभारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 26101 ही पुण्याहून सकाळी 6.25 ला निघेल आणि नागपूर (अजनी) ला सायंकाळी 6.25 लाच पोहोचले. अजनीहून सकाळी 9.50 ला निघेल आणि रात्री 21.50 ला पुण्याला पोहचेल. या वंदेभारत एक्सप्रेसने तुम्ही जर प्रवास करत असाव तर पुणे अजनी (नागपूर) चेअर कार तिकिट 1595 असेल. त्यामध्ये
एक्झिक्युटिव्ह कारचा दर जास्त असणार आहे. मात्र, या गाडीमुळे नागपूरकरांचा प्रवास अधिक चांगला आणि सोप्पा नक्कीच झाला आहे.