Raju Shetti Criticizes PETA : रामायणापासून ते शिवरायांपर्यंत...! राजू शेट्टींनी केले 'पेटा'वर आघात, काय आहेत गंभीर आरोप?
esakal August 11, 2025 05:45 AM

PETA Animal Commercialization : माधुरी उर्फ महादेवी हत्ती प्रकरणात पेटा या प्राणीमित्र संस्थेने अनेक संशयास्पद भूमिका घेतल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एखाद्या गोष्टीत समन्वयाची व व्यवहारिक भूमिका महत्वपूर्ण असते. पेटा या संस्थेने देशात व देशाबाहेर काम करत असताना अशापध्दतीने त्यांच्या उद्देशांना बाजूला ठेवून एकप्रकारे मिळालेल्या संधीचा गैरवापर करण्यास सुरवात केली आहे. असा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत पेटाला चांगलेच सुनावले आहे.

देशभरात जवळपास ३० हजार हून अधिक हत्तींची संख्या आहे. यापैकी २६७५ पाळीव हत्ती (कॅप्टीव्ह एलिफंट) आहेत. रामायण महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळापर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये पाळीव प्राण्यात हत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. देशभरात पाळीव हत्ती हे शेकडो वर्षापासून परंपरागत पाळले जात असून त्यांचा स्वतंत्र कायदा करून १९७२ च्या वन्यजीव सरंक्षण कायद्यात सरंक्षण देण्यात आले आहे. वर्षानुवर्षे या प्राण्यांची प्रजाती जंगली सहवासापासून दूर असल्याने त्यांना मानवी सहवासात पाळले गेले आहे.

माधुरी हत्तीची परंपरा सुध्दा (कॅप्टीव्ह एलिफंट) या अनुसुचित मोडते. गेल्या ३८ वर्षापासून ती मानवी सहवासात राहिलेली आहे. यामुळे तिची देखभाल व शारीरीक सदृढता ही तितक्याच काळजीपूर्वक व गाभीर्यांने केली जाते. पेटा या संस्थेने भारतात २००० साली काम करण्यास सुरवात केले. या संस्थेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्राण्यांच्या संवर्धनासाठी देणग्या गोळा करून अमेरीका स्थित संस्थेचा कारभार चालविला जातो. कोट्यावधी रूपयाचा निधी या संस्थेस दरवर्षी अनेक ठिकाणाहून दिला जातो.

पेटा संस्थेचा उद्देश प्राण्यांचे संवर्धन करणे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या मुळ सहवासात सोडणे हा आहे. मात्र या संस्थेने गेल्या काही वर्षापासून हेतुपूर्वक काम करण्यास सुरवात केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पेटाने प्राण्यांच्या माध्यमातून व्यावसायिकपणा सुरू केला आहे.

Kolhapur Circuit Bench : आनंदाचा क्षण! दिवस ठरला, सरन्यायाधीश गवईंच्या हस्ते सर्किट बेंचचे उद्घाटन

विशेषता देशातील पाळीव हत्तींच्याबाबत गेल्या काही वर्षात त्यांनी वनतारा या प्राणी पुनर्वसन केंद्राकडे हत्ती पाठविण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. देशभरातील अनेक जाती धर्माच्या संस्था , मठ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे असलेल्या पाळीव हत्ती वनतारा येथे हेतुपुर्वक पाठविण्यात येत आहेत. वनतारा हे जर प्राणी पुनर्वसन केंद्र असेल व तिथे कायमस्वरूपी प्राणी व पक्षी संग्रहालय करण्यास केंद्र सरकारची मान्यता नसेल तर तिथे वर्षानुवर्षे प्राणी व पक्षी कसे पाळले जातात याकडे पेटाने कसे दुर्लक्षित केले आहे.

पेटाला खरच जर प्राणी संगोपनाबाबत निस्वार्थपणे काम करायचे असल्यास पाळीव हत्तीबाबत संबधित संस्था व मठांना भेटून हत्ती संगोपनाबाबत मार्गदर्शन करावे , त्यांच्या आरोग्याच्या उपाययोजनाबाबत सुचना कराव्यात. मात्र हेतू ठेवून एका विशिष्ट संस्थेकडे हे हत्ती पाठविण्यासाठी न्यायव्यवस्था व प्रशासन हाताशी धरून षंडयंत्र रचून रूढी , परंपरा , संस्कृती व वारसा संपवून समाजव्यवस्थेत दरी निर्माण करू नये. जोतिबा येथील हत्तीबाबत अशाच पध्दतीने तक्रार करून तो हत्ती जंगलात सोडण्यात आला. मात्र तो पाळीव हत्ती असल्याने तेथील सहवासात तो न रमल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत पेटाने याची जबाबदारी घेणे आवश्यक होते.

Kolhapur Infant Case : शेतात पुरलेल्या अवस्थेत सापडले ३ महिन्यांचे अर्भक; पोलिसांसमोर मोठे आव्हान

अशा पध्दतीने एखादे काम दाखवून देशातील व परदेशातील अनेक संस्थाकडून कोट्यावधी रूपयाच्या देणग्या गोळा केल्या जातात. या पेटाकडे एवढा पैसा येत असल्यानेच त्यांच्याकडून नांदणीच्या हत्तीस २ कोटी , तासगांवच्या हत्तीस ३ कोटी अशा पध्दतीने ॲाफर देवून त्या वनतारा येथे सोडण्याचे कारस्थान केले जात आहे. खरच जर पेटाला काम करायचं असल्यास सध्या राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यात जवळपास ७ लाख लोकांना गेल्या वर्षभरात कुत्र्यांनी चावा घेतला असून अनेक लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे राज्यात कुत्र्यांसाठी संवर्धन केंद्र उभारावे. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.