मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना यापुढेही चालू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लाडक्या बहिणींमुळेच राज्यात आम्ही सत्तेवर आलो. तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता आम्ही सगळे भाऊ सातत्याने कार्यरत आहोत. शिवाय लाडकी बहीण योजना यापुढेही चालूच राहील आणि योग्य वेळी मानधनातही वाढ केली जाईल, असं आश्वासनही त्यांना राज्यातील बहिणींना दिलं आहे.
Election Commission : देशातील 334 पक्षांची मान्यता रद्दकेंद्रीय निवडणूक आयोगाने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यानुसार देशातील तब्बल 334 नोंदणीकृत मात्र, मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करत त्यांना निवडणूक यादीतून वगळले आहे. यात महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांचा समावेश आहे.
Eknath Shinde : आदिवासी समाजाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देणार नाहीशिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देण्याचे काम सरकार कधीही करणार नसल्याचं आश्वासन दिलं, तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.