साधारणपणे पोटात दुखायला लागल्यावर आपण काहीतर चरबट खाल्ले असेल, असा अंदाज लावतो. पण, दरवेळेला पोटदुखीमागे हेच कारण असेल असे नाही. यावर उपाय म्हणून घरगुती उपचार केले जातात. अगदी ओटीपोटातील वेदनेला साधी पोटदुखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. ओटीपोटातील वेदनेमागे विविध आजार असू शकतात, असे तज्ज्ञमंडळी सांगतात. तज्ज्ञांच्या मते, ओटीपोटात सतत वेदना होत असतील आणि त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर महिलेच्या एकूण आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आजच्या लेखात जाणून घेऊयात ओटीपोटात वेदना कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते.
मासिक पाळी –
तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये ओटीपोटात दुखण्यामागे विविध आजार असू शकतात. यातील सर्वात सामान्या म्हणजे मासिक पाळीदरम्यान वेदना.
एंडोमेट्रिओसिस –
एंडोमेट्रिओसिस हे कारण असू शकते. एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाचे अस्तर बाहेर वाढते. ज्यामुळे वेदना होता.
युरीनरी ट्रॅक आणि ब्लॅडर इन्फेक्शन –
ओटीपोटातल्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास इन्फेक्शच होऊन मलावरोधाची समस्या उद्भवू शकते. तसेच आतड्यांना सूज येऊ शकते.
ओटीपोटातील वेदनेसह पुढील लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञ सांगतात.
अशी घ्या काळजी
हेही पाहा –