Actress On Casting Couch: अनेकदा अभिनेत्रींसोबत कास्टिंग काउच सारखे भयानक प्रसंग झाल्याचे अनुभव समोर आले आहेत. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीही कास्टिंग काउचची बळी ठरली आहे. प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनने याबाबत मोठा खुलासा केला आहे. एका ऑडिशनच्या दरम्यान तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचे अभिनेत्रीने नुकत्याचं झालेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
'हिमांशू मेहता शो' मध्ये कास्टिंग काउचबद्दल जास्मिन भसीनने खुलासा केला. ती म्हणाली, 'मी मीटिंगसाठी गेले होते. पहिल्यांदा एका माणसाला दारू पिऊन ऑडिशन देण्यासाठी बोलताना पाहून मला घाबरले. कोऑर्डिनेटरही खोलीतून निघून गेला. म्हणून मी जास्तच घाबरले. त्यानंतर त्याने मला सांगितले- 'तुम्हाला हा सीन करायचा आहे.' मी म्हणाले- सर, ठीक आहे, मी सीन तयार करून उद्या येईन.' तर तो म्हणाला- 'नाही नाही, तुम्हाला ते आता करावे लागेल'. म्हणून मी ठिक आहे म्हणाले .'
Baaghi 4: 'हर आशिक एक विलेन है'; टायगर श्रॉफ आणि संजय दत्त येणार आमने-सामने, टिझर बघून चाहत्यांचा आली 'अॅनिमल' ची आठवणयानंतर, जास्मिन म्हणाली, 'त्याने मला सांगितले तुझा बॉयफ्रेंड निघून जात आहे, तुला त्याला थांबवावे लागेल.' तर मीही तेच केले. तो म्हणाला- नाही, असे नाही. नंतर त्याने मला बंद केले आणि दुसरे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता, पण मला काही तरी चुकीचं वाटलं म्हणून मी माझं कौशल्य वापरलं आणि मी तिथून पळून गेलो.' जस्मिन म्हणाली की यानंतर तिने ठरवले की ती हॉटेलच्या खोलीत कोणत्याही मीटिंगसाठी जाणार नाही.
Upcoming OTT Release: स्वातंत्र्यदिनी धमाकेदार चित्रपटांचा तडका; 'या' वेब सिरिज आणि चित्रपट होणार प्रदर्शितView this post on InstagramA post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)
जस्मिनने कबूल केले - इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच अस्तित्वात आहे
इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचबद्दल ती म्हणाली, 'मी म्हणेन की इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच सारखे प्रकार अस्तित्वात आहे, परंतु जे लोक कास्टिंग काउचसाठी कॉल करतात ते कधीचं कास्टिंग करत नाहीत. कारण ऑडिशन ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, परंतु मी सर्वांना सांगू इच्छिते की कायदेशीर कास्टिंग कॉल समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल, मला माहित आहे की प्रत्येकाला काम हवे आहे आणि ही निराशा आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते, परंतु ज्यांना कास्टिंग करायचे आहे ते कधीही कास्टिंग काउच करणार नाहीत.'