AUS vs AFG : अफगाणिस्तानच्या पराभवानंतर कॅप्टनने मॅक्सवेल नाहीतर आपल्याच खेळाडूला मानलं दोषी, म्हणाला…
Manoj Kumar August 12, 2025 04:44 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात कांगारूंनी 3  विकेटने विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 291 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना सहाव्या नंबरला फलंदाजीला येत क्रिकेटच्या इतिहासात चेस करत द्विशतक ठोकत मॅक्लवेलने एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यामध्ये मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामन्यानंतर बोलताना अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी याने संघातील एका खेळाडूला दोषी मानलं आहे.

काय म्हणाला अफगाणिस्तानचा कर्णधार?

आमच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केलेली मात्र हातात आलेली संधी गमावल्यामुळे वाईट वाटत आहे. मला माझ्या संघावर गर्व आहे मात्र सामना गमावल्याने निराश झालो आहे. मॅक्सवेल ३३ धावांवर असताना मुजीब उर रहमान याने झेल सोडला त्यानंतर मॅक्सवेलने प्रत्येक प्रकारचा शॉट खेळत आम्हाला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. कारण सामना अशा प्रकारे संपेल आम्हाला वाटलं नव्हतं पण शेवटी हा क्रिकेटचा भाग आहे. जादरान याने अफगाणिस्तानकडून पहिलं शतक केल्याचा मला अभिमान मात्र त्याचा संघाला काही फायदा झाला नाही. दक्षिण आफ्रिकेच्य सामन्यात आम्ही जोरदार कमबॅक करू, असं म्हणत हशमतुल्ला शाहिदीने सामना कुठे गमावला ते सांगितलं.

अफगाणिस्तान संघाच्या इब्राहिम जादरान याने नाबाद 129 धावांची खेळी केली. या खेळीसह अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्यासोबतच शेवटच्या काही ओव्हरमध्ये राशिद खान याने अवघ्या 18 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केलेली. यामध्ये त्याने २ चौकार तर ३ षटकार मारले.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.