मुंबई | क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही, असं म्हटलं जात. क्रिकेट चाहत्यांना आज हेच पाहायला मिळालं. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तावर अशक्य असा विजय मिळवत इतिहास रचला आहे. ग्लेन मॅक्सवेल याने ऑस्ट्रेलियाला गमावलेला सामना एकहाती जिंकून दिला. ग्लेन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावाचं आव्हान दिलं होतं. या विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 91 बाद 7 अशी स्थिती झाली होती. मात्र तिथून मॅक्सवेलने कॅप्टन पॅट कमिन्स याच्या सोबतीने सामना फिरवला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची विजयी आणि ऐतिहासिक भागीदारी केली.
ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 5 धावांची गरज असताना सिक्स ठोकून विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या सिक्ससह वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. मॅक्सवेल क्रिकेट विश्वात धावांचा पाठलाग करताना द्विशतक करणारा पहिलाच फलंदाच ठरला. ग्लेनने नाबाद 201 धावांची द्विशतकी खेळी केली. ग्लेनने 128 बॉलमध्ये 21 चौकार आणि 10 षटकारांसह 201 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने पॅट कमिन्स याने 68 बॉलमध्ये नॉट आऊट 12 रन्स करत अप्रतिम साथ दिली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.