मुंबई | ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला गमावलेला सामान जिंकून दिला आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा सलग सहावा विजय ठरला आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ग्लेन मॅक्सवेल याच्या द्विशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह नवव्यांदा वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे.
त्याआधी अफगाणिनस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झद्रान याने सर्वाधिक 129 धावांची शतकी खेळी केली. राशिद खान यान नाबाद 35 धावा केल्या. रहमतने 30 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 26 रन्स केल्या. अझमतुल्लाहने 22 तर गुरुबाजने 21 धावा जोडल्या. मोहम्मद नबीने 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने 2, तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा या तिघांनी 1-1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.