जसप्रीत बुमराह आशिया चषक 2025 स्पर्धेत खेळणार आहे.
स्पर्धा 9 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये सुरू होणार आहे.
वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराहला विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत विश्रांती मिळू शकते.
Ajit Agarkar selection committee decisions 2025 : जसप्रीत बुमराहच्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत खेळण्याच्या सस्पेन्स अखेर दूर झाला आहे. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज आशिया चषक स्पर्धेत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० फॉरमॅटच्या या स्पर्धेत बुमराह खेळणार आहे. मागील आठवडाभर त्याच्या फिटनेसवरून आणि वर्कलोड व्यवस्थापनावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराह तीन कसोटी सामने खेळला होता. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच कामाच्या ताणाचं नियोजन करण्यासाठी त्याला तीन कसोटीत खेळवले जाईल, हे स्पष्ट केले गेले होते. पाचव्या कसोटीत त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागले होते, असे वृत्त समोर आले होते. आता भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेनंतर लगेचच विंडीजविरुद्धची मालिका असल्याने जसप्रीतच्या वर्कलोडचा पुन्हा प्रश्न उपस्थित होणार आहे.
Asia Cup 2025: केएल राहुल, यशस्वी जैस्वालचा पत्ता कट! टॉप फाईव्हमध्ये सरस फलंदाज, असा असेल १५ जणांचा भारताचा तगडा संघ...पीटीआयच्या वृत्तानुसार बीसीसीआयने पुरेशी विश्रांती दिली जाईल, असे ३१ वर्षीय जसप्रीतला सांगितले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने निवड समितीकडे सर्व खेळाडूंच्या फिटनेसचा अहवाल सोपवल्यानंतर १९ किंवा २० ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला जाईल. सूर्यकुमार यादव हाही बंगळुरूच्या NCA मध्ये तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करतोय.
बुमराहसोबत आशिया चषक स्पर्धेत अर्शदीप सिंग याच्या खांद्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी असणआर आहे. त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. बुमराह या स्पर्धेत खेळणार असल्यास तो विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. आशिया चषकाची फायनल २८ सप्टेंबरला होईल आणि विंडीजविरुद्धची पहिली कसोटी २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयचे अधिकारी जसप्रीतला पहिल्या कसोटीत विश्रांती देण्याच्या विचारात आहेत. गरज पडल्यास जसप्रीतला विंडीजविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतूनच विश्रांती दिली जाईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने घरच्या मैदानावर होणारी ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.
FAQsप्र.१: जसप्रीत बुमराह आशिया चषक 2025 मध्ये खेळणार का?
उ: होय, बुमराहचा सहभाग निश्चित झाला आहे.
प्र.२: आशिया चषक 2025 केव्हा सुरू होणार आहे?
उ: स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होईल.
प्र.३: बुमराहला विंडीज मालिकेतून विश्रांती मिळेल का?
उ: होय, पहिल्या कसोटीत किंवा संपूर्ण मालिकेत विश्रांती मिळू शकते.
प्र.४: भारताचा आशिया चषक संघ केव्हा जाहीर होईल?
उ: 19 किंवा 20 ऑगस्टला जाहीर होईल.
प्र.५: बुमराहसोबत गोलंदाजीची जबाबदारी कोण सांभाळणार आहे?
उ: अर्शदीप सिंग ही जबाबदारी सांभाळेल.
प्र.६: आशिया चषकाची फायनल आणि विंडीज मालिकेची तारीख काय आहे?
उ: फायनल 28 सप्टेंबरला, तर पहिली कसोटी 2 ऑक्टोबरला होईल.