सातारा, : निवडणूक आयोग चोर है.., राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करत जिल्हा काँग्रेसने राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस भवनाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले.
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आंदोलन झाले. या वेळी बाबासाहेब कदम, नंदाभाऊ जाधव, बाबूराव शिंदे, राहुल चव्हाण, अरबाज शेख, अमर करंजे, रजनी पवार, अल्पना यादव, रजिया शेख, मनीषा साळुंखे, जगन्नाथ कुंभार, नाझिम इनामदार, अमरजित कांबळे, मनोजकुमार तपासे, रणधीर गायकवाड, सुरेश इंगवले, झाकिर पठाण, संजय तडाखे, संतोष डांगे, संतोष काशीद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात निवडणूक आयोग व भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवडभारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने मिळून बनावट मतदार यादी तयार करून मतदानाची चोरी केले आहे. या विरोधात आवाज उठविण्यावरून राहुल गांधींना अटक करणे म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे.’’