ज्योतिषशास्त्रात प्रत्येक प्राण्याचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी जोडलेला आहे. यातील एका महत्वाच्या प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे कुत्रा. अनेकांना कुत्रा पाळण्याचा शौक असतो. पण तुम्हाला माहितीये का, कुत्र्याचे पालन केल्याने तुमच्या जीवनावर त्याचे अनेक परिणाम होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कुत्र्याची सेवा केल्याने किंवा त्याला पाळल्याने अनेक ग्रहांचे दोष शांत होतात. कुत्र्याची सेवा केल्याने त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. कुत्रा पाळल्याने नेमके कोणते ग्रह शांत होतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.
जर तुम्ही शनिग्रहाच्या साडेसातीमुळे त्रस्त असाल, तर कुत्र्याची सेवा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही एखाद्या काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातली तर शनिदेव प्रसन्न होतात. त्यांच्या त्रासातून दिलासा मिळतो.
राहू आणि केतू हे ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले जातात. हे ग्रह आयुष्यात अचानक समस्या निर्माण करतात. अशा परिस्थितीत, काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने राहू-केतूशी संबंधित दोष शांत होतात. तसेच जीवनातील अडचणी कमी होतात.
भैरव बाबा यांना कुत्र्यांचे अधिपति मानले जाते. कुत्र्याची सेवा केल्याने भैरव बाबा प्रसन्न होतात. यामुळे जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे दूर होतात.
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल, तर कुत्रा पाळणे किंवा त्याची सेवा करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पूर्वजांना शांती मिळते. तसेच त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अनेक समस्या दूर होतात.
रात्री वाईट स्वप्ने पडत असतील तर कुत्र्याची सेवा करणे हा एक उत्तम उपाय आहे. कुत्र्याला नियमितपणे जेवण दिल्याने आणि त्याची काळजी घेतल्याने मानसिक शांतता मिळते, ज्यामुळे चांगली आणि शांत झोप लागते.
जर तुम्ही आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल, तर कुत्र्याला पोळी खाऊ घालावी, यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. कुत्र्याची निस्वार्थ सेवा केल्याने धन लाभाचे योग निर्माण होतात, असे म्हटलं जाते.
त्यामुळे कुत्र्याची सेवा करणे केवळ एक प्राणी प्रेम नाही, तर यामुळे तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येऊ शकते. यामुळे यापुढे कुत्रा पाळताना त्याकडे फक्त छंद म्हणून नव्हे तर त्यातून जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम म्हणूनही पाहायला हवे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)