रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
'कुली' पाहण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
तसेच 'कुली' चित्रपटाची तिकिट देखील फ्री दिली आहे.
सध्या सर्वत्र रजनीकांत (Rajinikanth) यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'कुली' (Coolie ) चित्रपट उद्या (14 ऑगस्ट)ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंगापूरमधील कंपनीने त्यांच्या तमिळ कर्मचाऱ्यांना रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोचे तिकीट देखील फ्री देत आहे.
14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'कुली' चित्रपटाने आगाऊ बुकिंगने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतयांचे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन होणार आहे. चाहते यासाठी खूप उत्सुक आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने चाहत्यांमध्ये इतका उत्साह निर्माण केला आहे की थिएटरबाहेरून सोशल मीडियापर्यंत फक्त 'कुली'ची चर्चा आहे.
कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटेइकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, मदुराईच्या युनो अॅक्वा केअर कंपनीने रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टीजाहीर केली आहे. कंपनीने सोशल मीडियावर तशी एक नोटीस जारी केली आहे. ही सुट्टी चेन्नई, बंगळुरू, त्रिची, तिरुनेलवेली, चेंगलपट्टू, मट्टुथवानी आणि अरापलयमसह सर्व शाखांमध्ये लागू असेल.
View this post on InstagramA post shared by Lokesh Media (@lokesh.media)
तसेच या चांगल्या प्रसंगी कंपनीने अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये अन्न वाटप करण्याची, सामान्य लोकांना मिठाई वाटण्याची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कुलीची मोफत तिकिटे देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, सिंगापूरच्या एका कंपनीने चित्रपटाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या तमिळ कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.
तिकिट बुकिंगमध्ये रेकॉर्ड ब्रेकमीडिया रिपोर्टनुसार, 'कुली' चित्रपटाने भारतात आगाऊ बुकिंगमधून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. परदेशात पहिल्या दिवसाचे बुकिंग 37 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. अशाप्रकारे, एकूण आगाऊ बुकिंग 100 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
Indrayani : अंधश्रद्धेला झुगारून 'इंद्रायणी' गावात कशी सुरू करणार शाळा? पाहा VIDEO