20 मर्डरचा आरोपी, भगवे वस्त्र, गळ्यात माळा असलेल्या गँगस्टर अभिनेत्रीला म्हणाला, 'मला तू आवडते…', त्या जे झालं ते…
Tv9 Marathi August 13, 2025 05:45 PM

Actress Life: बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिच्या नावातच भाग्य आहे… अभिनेत्रीचे संबंध राजघराण्याशी आहेत. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात काम करण्यासाठी भाग्यश्री हिचा स्पष्ट नकार होता. अभिनेत्रीला अनेरिकेत शिक्षणासाठी जायचं होतं. पण दिर्गर्शक सुजर बडजात्या जवळपास सात वेळा भाग्यश्री हिच्या घरी गेले आणि स्क्रिप्टमध्ये देखील त्यांनी अनेक बदल केले. तेव्हा अभिनेत्री कॉलेजमध्ये होती. सकाळी कॉलेज संपल्यानंतर भाग्यश्री सिनेमाच्या शुटिंगसाठी जायची.

भाग्यश्री हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, भाग्यश्री हिने खऱ्या गँगस्टरसोबत देखील सिनेमात काम केलं आहे. या गँगस्टरने तब्बल 20 मर्डर केले होते… शुटिंग दरम्यान गँगस्टर अभिनेत्राला ‘मला तू आवडतेस असं म्हणाला…’ यानंतर काय झालं?

एका मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, ‘मी जेवढे सिनेमे केले आहेत. त्या सिनेमांमध्ये माझी भूमिका लक्षात राहील अशी आहे. फक्त हिच एक गोष्ट लक्षात ठेवून मी सिनेमे साईन केले आहेत. त्या काळात लग्न झालेल्या अभिनेत्रींना चांगल्या भूमिका देखील मिळत नव्हत्या. ज्या भूमिका असायच्या त्या मला आवडत नव्हत्या. मी काही कन्नड, तेलुगू आणि काही बांग्ला सिनेमांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये मी एका गुन्हेगारासोबत काम केलं. मला या सिनेमा दरम्यान प्रचंड भीती वाटली होती.’

अभिनेत्री म्हणाली, ‘सरकारची परवनगी घेवून गुन्हेगाराला शुटिंगसाठी तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. सिनेमाची कथा देखील गुन्हेगारांच्या आयुष्याभोवती फिरत आहे. सिनेमात मी एका जर्नालिस्टची भूमिका साकारली. मी गुन्हेगारांकडे जाते त्यांना भेटते… सिनेमात मला असं सांगायचं होतं की, कोणताच गुन्हेगार जन्मतः गुन्हेगार नसतो. परिस्थिती माणसाला नकोत्या गोष्टी करण्यास भाग पाडते… समान या गुन्हेगारांना एक चांगली व्यक्ती घडवू शकतो…’

‘जेव्हा मी सिनेमा साईन केला, तेव्हा मी प्रचंड आनंदी होती. मी शुटिंगसाठी सेटवर पोहोचली. तेव्हा मला सांगण्यात आलं की, गँगस्टर शुटिंगसाठी येणार आहे. त्याने जवळपास 20 – 30 लोकांची हत्या केली आहे. तो गँगस्टर भगवे वस्त्र घालून होता, गळ्यात माळा होत्या… त्याच्या मागे 10 – 12 बॉडीगार्ड्स होते. तो आला आणि मला म्हणाला, ‘मला तू फार आवडते…’ तो असं म्हणाल्यानंतर मला देखील भीती वाटली…’

पुढे अभिनेत्री घडलेला विनोदी किस्सा सांगितला, गँगस्टर अभिनेत्रीला म्हणाला, ‘माझी एक लहान बहीण आहे, जी हुबेहूब तुझ्यासारखी दिसते… त्यानंतर माझ्या मनातील भीती कमी झाली…’ असं देखील अभिनेत्रीने सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.