भोर आणि मुळशीतील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये दाखल.
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजप नेत्यांनी विकासाच्या गतीला चालना देण्याचे आश्वासन दिले.
या घडामोडीमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.
Sharad Pawar NCP leaders joining BJP in Pune : पुणे जिल्ह्यातील भोर आणि मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश हुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते. भोर मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश झाले.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यात विकासाचे पर्व सुरू आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राप्रमाणे सर्वदूर विकासात्मक कामे गतीने सुरू आहेत. आज या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपा मध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही करू. या परिसरात अनेक वर्षे असलेला विकासात्मक अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्नही आपण एकत्रितपणे करू अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!संग्राम थोपटे म्हणाले की राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सर्व महायुती सरकारसोबत येऊन काम करू. मुळशी तालुक्यातील आजी माजी सरपंच, विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये माणचे उपसरपंच शशिकांत धुमाळ, उपसरपंच रवि बोडके, हिंजवडीचे मा. सरपंच विक्रम साखरे, माणचे मा. उपसरपंच बाळासाहेब बालवडकर, शप गट जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश भोईर, मारुंजीचे मा.सरपंच बाळासाहेब बुचडे, कातरखडकचे मा.सरपंच योगेश पापळ, माण सोसायटी चेअरमन विलास गवारे, अर्जुन पारखी आदींचा समावेश आहे.
"असा धडा शिकवणार की...", मुनीरनंतर शरीफनेही गरळ ओकली, भारताला पुन्हा पोकळ धमकी