लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुण्याच्या विशेष कोर्टात आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की स्वातंत्र्य वीर सावरकर संदर्भातील वक्तव्याने माझ्या जीवाला धोका आहे. दोन नेत्यांनी मला धमकी दिली होती. कोर्टात राहुल गांधी यांनी आपल्याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित बदनामीचा हा खटला असून ज्यात तक्रारदाराच्या तक्रारीनंतर राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला आहे.
राहुल गांधी यांच्यावतीने वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात लिखित निवेदन देऊन तक्रारदार नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज आहेत, त्यांची पार्श्वभूमी हिंसक कारवायांशी संबंधित आहे.सध्याचा राजकीय वातावरण पाहाता आणि काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे गांधी यांच्या वकीलांनी कोर्टाला सांगितले.कोर्टाने हा मुद्दा विचारात घेतला आहे.
तक्रारकर्ते नथुराम गोडसेचे वंशजराहुल गांधी यांनी सांगितले की तक्रारकर्ता नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज आहेत. त्यांचा इतिहास हिंसक गतिविधींशी जोडलेला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी रवनीत सिंह बिट्टू आणि तरविंदर सिंह मारवाह यांचा देखील उल्लेख केला.
रवनीत यांनी राहुल यांना अतिरेकी म्हटले होते –
राहुल गांधी यांच्या अर्जात रवनीत सिंह बिट्टू यांचे नाव आहे. रवनीत याने राहुल गांधी यांना देशातले अतिरेकी नंबर एक असल्याचे म्हटले होते. याशिवाय याचिकेत तरविंदर सिंह मारवाह यांचेही नाव आहे. मारवाह यानेही राहुल गांधी यांना धमकी दिली होती. तरविंदर सिंह याने राहुल गांधी यांचे हाल त्यांच्या आजी सारखे होतील. राहुल यांच्या वकीलांनी कोर्टाला विनंती केली की राहुल गांधी यांना अतिरिक्त संरक्षण देण्याची मागणी केली.
विनायक दामोदर सावरकर यांचे पणूत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे कोर्टात तक्रार दाखल केली होती. यात राहुल गांधी यांनी लंडन येथे एका भाषणात म्हटले होते की सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी एक मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला. सात्यकी यांनी या दावा फेटाळत असा कोणता उल्लेख सावरकर यांच्या लिखाणात नाही.