झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध, सेलिब्रिटी महिलांची होणारी फसवणूक… यांसारख्या अनेक गोष्टी झगमगत्या विश्वात घडत असतात. एका असा खेळाडू आहे, ज्याने अनेक सेलिब्रिटी महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने अभिनेत्या दुसऱ्या बायकोसोबत संबंध ठेवलं… त्यानंतर लग्ना आधी तो बाप देखील झाला. सध्या ज्या खेळाडूच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर, लिएंडर पेस आहे. लिएंडर पेस याच्या एका पार्टरने तर त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोपही केले आहे. तर हे प्रकरण नक्की काय आहे, हे जाणून घेवू.
टेनिसपटू लिएंडर पेस यांचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत असलेल्या टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. पण फार काळ दोघांचं नातं टिकलं नाही. दरम्यान, अनेक वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत महिमा चौधरीने लिएंडर पेस यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला.
मुलाखतीत महिमा म्हणाली, ‘लिएंडर एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण तो चांगला माणूस नाही.’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमा चौधरीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना लिएंडरने संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर महिमा हिने लिएंडर दूर राहण्याचा निर्णय घेतला.
संजय दत्तची दुसरी पत्नी आणि लिएंडर पेसलिएंडर पेस याच्यासोबत रिया पिल्लई हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळताच संजूबाबाने रिया हिला घटस्फोट दिला. घस्फोटानंतर रिया आणि लिएंडर लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांना एक मुलगी देखील आहे. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.
रिया पिल्लई आणि लिएंडर पेस जवळपास 9 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण रिया हिने 2014 मध्ये लिएंडर यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. हे प्रकरण अनेक वर्ष कोर्टात सुरु होतं. त्यानंतर लिएंडर पेस आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. आता रिया लेकीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
एवढंच नाही तर, लिएंडर याचं नाव अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघेही विभक्त झाले. 2021 मध्ये किम हिने फोटो शेअर सर्वांसमोर नात्याची कबूली दिली. पण दोन वर्षांनंतर किम आणि लिएंडर पेस यांचे मार्ग वेगळे झाले आहेत.