इंदापूर, ता.१७ : इंदापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात तसेच इंद्रेश्वर मंदिरात श्रावणानिमित्त दर सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. मंदिरातील आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वराच्या पालखीची प्रत्येक सोमवारी पालखीची ग्राम प्रदर्शनेसाठी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येते. श्रावणानिमित्त मंदिराला आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. तसेच पहाटेची महाआरती, रुद्राभिषेक व सायंकाळी पाच वाजता महादेवाची पालखीची मिरवणूक ग्रामप्रदर्शनेसाठी निघते. पालखी ग्राम प्रदर्शना करून ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरामध्ये येते तेथे इंद्रेश्वर देवाची महाआरती होते नंतर श्रीराम प्रभूची आरती होऊन पुन्हा पालखी सिद्धेश्वर मंदिरात आणण्यात येते. तेथे आल्यानंतर सिद्धेश्वर देवाची महाआरती होते. यावेळी हजारो भाविक आरतीसाठी उपस्थित असतात. मनोभावे सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन प्रसाद वाटप केला जातो.
सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी, मंदिराचे ट्रस्टी, आरती मंडळाचे सदस्य, समस्त इंदापूर शहरातील नागरिक या सर्वांच्या सहभागाने श्रावण मासातील उत्सव साजरा केला जातो.
05988