फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका येथे शुक्रवारी (ता. १५) ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसामुळे मका, कपाशी, तूर पिकासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाची महसूल विभागाने शनिवारी पाहणी केली.
जोरदार पावसामुळे अनेक शेतांमधून पाणी वाहून निघाल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे नद्यांना भरगच्च पाणी वाहून आल्याने नदीकाठची अनेक शेती, माती बांध पुराच्या पाण्यामुळे सरसपाट झाले आहे.
यामध्ये शेतकरी रामराव वाघ अण्णा वाघ, लक्ष्मण वाघ, बाबासाहेब वाघ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार शिवानंद बिडवे, तालुका कृषी अधिकारी राम गुळवे, मंडळ अधिकारी विश्वनाथ नागोरडे, तलाठी अश्विनी मसावले, कृषी सहायक सुरेश सुरडकर आदींनी प्रत्यक्ष पाहणी केली.
Gungapur Crime: मुद्देश वाडगावात सहावीच्या विद्यार्थ्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी बिबट्याने खाल्ल्याचा निर्माण केला आभास जळगाव महामार्गावर पूरछत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसाने महापूर आला होता. एक बाजू पूर्णपणे ढगफुटी झाल्याने पाण्याने व्यापली होती. त्यामुळे जळगाव महामार्गावरील जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.