Indian swimmer medals stolen: दिग्गज भारतीय खेळाडूच्या घरात चोरी! पद्मश्री पुरस्कारासह 150 मेडल्स चोरले
esakal August 18, 2025 06:45 AM
  • पद्मश्री पुरस्कार विजेती जलतरणपटू बुला चौधरीच्या वडिलोपार्जित घरात चौथ्यांदा चोरी झाली आहे.

  • चोरांनी १५० हून अधिक पदके, पद्मश्री आणि राष्ट्रपती पुरस्कारांसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत.

  • पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भारताच्या दिग्गज खेळाडूच्या बाबतीत धक्कादायक घटना घडली आहे. भारताची पद्मश्री पुरस्कार विजेती जलतरणपटू बुला चौधरी हिच्या घरी चोरी झाली आहे.

हुबळीतील हिंदमोटरमधील देबाईपुकूर येथील वडिलोपार्जित घरात चोरी झाली आहे. यामध्ये तिचे मोठे नुकसात झाले आहे. रिपोर्ट्लनुसार तिने मिळवलेल्या १५० हून अधिक पदकांची चोरी झाली असून यात पद्मश्री पुरस्कारच्या ब्रुचही चोरीला गेले आहे.

Solapur Crime:'साक्षीदार असलेली महिलाच निघाली चोर'; केअर टेकर म्हणून काम करत केली चोरी, ८.८१ लाखांचे दागिने जप्त

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार बुला चौधरीच्या घरी चौथ्यांदा चोरी झाली आहे. चोरांनी मागच्या दाराने घरात प्रवेश केला आणि अनेक मेडल्स चोरले. पद्मश्री पुरस्काराव्यतिरिक्त राष्ट्रपती पुरस्कार, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी अनेक स्पर्धांमध्ये जिंकलेल्या पदकांची चोरी झाली.याशिवाय त्यांनी घरातील अनेक गोष्टींचेही नुकसान केले आहे. बाथरुमच्या बेसीनचा नळही चोरला आहे.

बुला चौधरी सध्या कोलकातामध्ये तिच्या कुटुंबासमवेत राहते. पण बऱ्याचदा ती तिच्या वडिलोपार्जित घरी जात असते. तिथे तिचा भाऊ डोलन चौधरी त्यांच्या आजी-आजोबांसह राहतो. चोरीनंतर डोलनने निराशा व्यक्त केली असून त्याने म्हटले की यापूर्वीही तीनदा चोरी झाल्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र,तरीही अशा घटना घडतच आहेत.

बुला चौधरीनेही याबाबत निराशा व्यक्त करताना म्हटले की तिच्या सर्व मौल्यवान गोष्टी चोरांनी नेल्या आहेत. तिची आयुष्यभराची कमाई त्यांनी चोरल्याची भावना तिने व्यक्त केली. तथापि, याप्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Video: निवृत्त न्यायाधीशाच्या घरात चोरी; चोरट्यांसमोर झोपण्याचे नाटक करून 'असा' वाचवला जीव

१९७० मध्ये जन्मलेल्या बुला चौधरीने वयाच्या नवव्या वर्षीच राष्ट्रीय जलतरण स्पर्धा जिंकली होती. तिने नंतर दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली. तिला १९९० मध्ये अर्जून पुरस्कार आणि २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

FAQs

बुला चौधरीच्या घरात चोरी कितव्यांदा झाली आहे?

(How many times has Bula Choudhury’s house been robbed?)

बुला चौधरीच्या घरात चौथ्यांदा चोरी झाली आहे.

या चोरीत कोणत्या गोष्टी चोरीला गेल्या?

(What items were stolen in the robbery?)

बुला चौधरीचे १५० हून अधिक पदकं, पद्मश्री ब्रुच, राष्ट्रपती पुरस्कार आणि इतर वस्तू चोरीला गेल्या.

बुला चौधरी सध्या कुठे राहते?

(Where does Bula Choudhury currently live?)

बुला चौधरी सध्या कोलकात्यात कुटुंबासह राहते.

बुला चौधरीला कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

(What awards has Bula Choudhury received?)

बुला चौधरीला अर्जुन पुरस्कार (१९९०) आणि पद्मश्री (२००९) मिळाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.