Mumbai Rain alert : महाराष्ट्रावर मोठं संकट… गरज असेल तरच घराबाहेर पडा, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, नेमकी अपडेट काय?
Tv9 Marathi August 19, 2025 08:45 PM

महाराष्ट्रासह मुंहईत गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज मंगळवारी देखील कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज (मंगळवार 19 ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. आपत्कालीन व्यवस्थेतील कार्यालये वगळता सर्व कार्यालयांना सुट्टी  जाहीर करण्यात आली आहे.

मात्र अत्यंत महत्वाचं काम असेल तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम हा ऑप्शन वापरण्यासही सांगण्यात आलं आहे. मुंबईतील नागरिक, चाकरमानी अडकून पडू नयेत तसेच कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही महापालिकेतेर्फे करण्यात आले आहे. मात्र गरज नसेल घराबाहेर पडू नका असं आवाहन पालिकेतर्फे सर्वांना करण्यात आलं आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.  मात्र असं असलं तरी अत्यावश्यक सेवा आज सुरू राहणार आहेत.

तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडणं टाळा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

📢All Government and Semi-Government Offices in Mumbai will remain closed today, 19th August 2025

🔹Private offices / institutions / establishments are advised to instruct their employees to work from home

🌧️The India Meteorological Department has issued a Red Alert today, i.e.…

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)

रेल्वे सेवेवरही परिणाम

भारतीय हवामान विभागाने कालच मुंबई व महाराष्ट्रातील अनेक भागांना रेड अलर्ट तर काही भागांना यलो अलर्ट जारी केला होता. गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस आजही सकाळी कायम असून त्यामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आहे. पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या लाईफलाईनवर अर्थात रेल्वे सेवेवरही झाला असून अनेक ठिकाणी रेल्वे सेवा अतिशय संथ गतीने सुरू आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे, ठिकठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने तसेच पावसामुळे दृश्यमानत कमी झाल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन रेल्वे सेवा मंदावली आहे.

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.