Weather Update : या राज्यात पाऊसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा तो अंदाज काय? अनेक शहरातील रस्त्यांवर महापूर
Tv9 Marathi August 19, 2025 08:45 PM

Today Weather Update : देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोपडून काढले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक वाहनं या पुरात बुडाल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात तर पावसाने हाहा:कार माजवला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. 19 ऑगस्ट 2025 पर्यंत दक्षिण ओडिसा ते आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य भारताला पावसाचा मोठा फटका बसणार आहे. मध्य भारतात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये पावसाचे धुमशान

दिल्ली NCR मध्ये 24 तासात तापमानात मोठा फरक दिसला नाही. पण गेल्या 24 तासात अनेक जागांवर तुफान पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार, 19 ऑगस्ट 2025 रोजी अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागात ढगांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे. तर या काळात दिल्ली आणि एनसीआरमध्ये कमाल तापमान 33 डिग्री सेल्यियस आणि किमान तापमान 25 डिग्री सेल्यियस असेल.

महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाचे थैमान

उत्तर-पूर्व राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, 20-24 ऑगस्ट 2025 या काळात नागालँड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयामध्ये पावसाचे थैमान दिसेल. तर पश्चिम भारतात महाराष्ट्र, गोवा आणि कोंकणाला जोरदार पावसाचा फटका बसेल. 18-19 ऑगस्ट रोजी तुफान पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. गुजरातला 19-20 ऑगस्ट 2025 या काळात पावसाचा फटका बसेल.

महाराष्ट्रात सर्वदूर मुसळ’धार’

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या चार दिवसात तर पावसाने कहर केला आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाचा फटका बसला. मध्यरात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी,विलेपार्ले,गोरेगाव, मालाड,बोरिवली, कांदिवली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग दिसली. अनेक सखल भागात पाणी साचले. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. मुंबई आणि नवी मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. येत्या 12 तासात या भागाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.