सकाळचा नाश्ता चुकूनही स्कीप करू नये, असे तज्ञमंडळी सांगतात. कारण दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्त्वाची भूमिका निभावतो. साधारणपणे सकाळच्या नाश्त्यात दूध, अंडी, केळी किंवा अगदीच चहासोबत खारी, टोस्ट, बटर खाण्यात येते. पण, काहीजण सकाळच्या नाश्त्यात असे पदार्थ खातात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषकत्तत्वे मिळण्याऐवजी आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेष करून या पदार्थांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. चला तर मग जाणून घेऊयात हृदय निरोगी राहण्यासाठी नाश्त्यातील असे पदार्थ जे नाश्त्यात खाणे टाळायला हवेत.
पराठा आणि लोणचे –
कित्येक घरात सकाळी पराठा आणि लोणचे नाश्त्यात खाल्ले जाते. पण, आरोग्यतज्ञांच्या मते, पराठा आणि लोणच्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. पराठा बनवताना तेलाचा वापर केला जातो. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच यात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढू शकतो.
ब्रेड बटर –
सकाळी कामावर, शाळा-कॉलेजला जाताना उशीर होत असल्याने अनेकजण नाश्त्यात ब्रेड बटर खातात. पण, यामुळे हृदयाशी निगडित समस्या वाढू शकतात. विशेष करून व्हाईट ब्रेड पचण्यास जड असतो. ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. याशिवाय बटरमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असतात, जे हार्टसाठी योग्य नसतात.
कचोरी आणि मिठाई –
जास्त गोड, साखरयुक्त मिठाईमुळे शरीरात जळजळ, लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. याशिवाय जास्त साखर खाल्ल्याने रक्दाबही वाढू शकतो. परिणामी, हृदयरोगाचा धोका वाढतो. तुम्ही जर कचोरी खात असाल तर तेही खाणे बंद करणे फायद्याचे ठरेल. कारण ती तेलात तळलेली असते.
बटाटा भुजिया –
आलू भूजियामध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी नाश्त्यात आलू भूजिया खाऊ नये.
चोल कुल्चे –
नाश्त्यात छोले कुलचे खाणे अगदी सामान्य आहे. पण, यात फॅटचे प्रमाण जास्त असते. परिणामी, जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.
हेही वाचा – बदलत्या वातावरणात सर्दीचा त्रास? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या हे सूप