भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने यजमान इंग्लंडचा टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत पराभव केला. त्यानंतर इंडिया ए वूमन्स टीम राधा यादव हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना झाली. मात्र राधा यादव हीच्या नेतृत्वात वूमन्स इंडिया ए संघाने निराशा केली. ऑस्ट्रेलिया ए वूमन्स टीमने भारताचा टी 20 मालिकेत धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलिया ए वूमन्स टीमने भारताला 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत केलं. मात्र त्यानंतर महिला ब्रिगेडने जोरदार कमबॅक केलं.
वूमन्स ए इंडियाने सलग 2 दोन्ही वनडे सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यामुळे भारताला सलग विजयी हटट्रिक करुन टी 20 सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात भारताला 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत केलं आणि विजय हॅटट्रिक करण्यापासून रोखलं. मात्र त्यानंतरही भारताने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली.
त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स यांच्यात 4 दिवसांची अनऑफशियल टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. हा सराव सामना असणार आहे. भारताचा हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर कांगारु भारताला रोखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या सामन्यात उभयसंघात 4 दिवस चढाओढ पाहायला मिळू शकते. या सामन्याबाबत महत्तवाची माहिती जाणून घेऊयात.