केळवे सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
पालघर, ता. १९ (बातमीदार) ः केळवे शेती उत्पादन खरेदी विक्री सहकारी सोसायटी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. २०२५ ते २०३० या काळासाठी ही निवडणूक झाली.
तालुक्यात अग्रगण्य अशी केळवे शेती सोसायटी आहे. या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली होती. एकूण ११ कार्यकारणी सभासदासाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील दोघांनी उमेदवारी मागे घेतल्याने दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अनुसूचित जातीसाठी उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही जागा रिकामी राहिली आहे.
यात संदीप सावे, जितेंद्र राऊत, चंद्रशेखर पाटील, विनोद राऊत, निलेश चौधरी, किशोर वर्तक, गणेश पाटील, किशोर गिरी व महिला राखीवमधून भारतीय सावे, उषा पाटील या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.