कोरेगाव भीमा, ता. २० : कोरेगाव भीमा येथील मीबा ड्राईव्हटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने जनसेवा ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून आयोजित या शिबिरामध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश बर्वे यांच्यासह कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांनी रक्तदान केले. ‘‘प्रत्येक नागरिकाने वर्षातून एकदा तरी रक्तदान केले पाहिजे. रक्तदान केल्याने आपले आरोग्य सुधारते,’’ असा संदेशही यावेळी देण्यात आला.