Job Growth: नोकरीचं टेन्शन संपलं! 2030 पर्यंत या क्षेत्रात 2.5 लाख नोकऱ्या निर्माण होणार
esakal August 22, 2025 11:45 PM
  • 2030 पर्यंत बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सुमारे 2.5 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

  • डिजिटल, कम्प्लायन्स, फ्रंटलाईन व इंश्युरन्स रोल्समध्ये मोठ्या प्रमाणावर हायरिंग होणार असून, ग्रामीण व टियर-2/टियर-3 शहरांमध्ये मागणी वाढत आहे.

  • रिपोर्टनुसार, हायरिंगमध्ये दरवर्षी 5% ते 10% वाढ होत असून, टेक्नॉलॉजी व कम्प्लायन्स रोल्सची मागणी सर्वाधिक आहे.

  • Banking and Financial Services Sector: 2030 पर्यंत बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. या सेक्टरमध्ये चालू आर्थिक वर्षात 8.7% वाढ झाली असून, 2030 पर्यंत ही वाढ 10% पर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. या वाढीमुळे सुमारे 2.5 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होतील. यामागे टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील वाढती मागणी हे कारण आहे.

    एडेको इंडियाच्या जाहीर झालेल्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत हायरिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढ झाली आहे. ही वाढ विशेषतः फ्रंटलाईन, डिजिटल आणि कम्प्लायन्स नोकऱ्यांमध्ये दिसून आली आहे. कंपनीचे डायरेक्टर कार्तिकेयन केसवन यांनी सांगितले की, ईएसजी स्ट्रॅटेजी, एआयएफ/पीएमएस कम्प्लायन्स आणि डिजिटल वेल्थ रोल्समध्ये मिड-सीनियर लेव्हल हायरिंगमध्ये 30% वाढ झाली आहे.

    Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

    बँकिंगसेक्टरमध्ये तंत्रज्ञान व कम्प्लायन्सवर आधारित हायरिंगमध्ये 9.75% वाढ झाली आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट बँका, कोअर बँकिंगचे आधुनिकीकरण, क्लाऊड-बेस्ड सिस्टिम्स, चॅटबॉट्स आणि डिजिटल अॅप्ससाठी टॅलेंटेड डिजिटल टीम्स तयार करत आहेत. तसेच एमएसएमई आणि ग्रामीण भागात कर्जाच्या वाढत्या मागणीमुळे लोन अंडररायटिंग, कलेक्शन आणि रेग्युलेटरी कम्प्लायन्स रोल्समध्ये 7-8.25% हायरिंग ग्रोथ झाली आहे.

    फायनान्शियल सर्व्हिसेस व इंश्युरन्स सेक्टरमध्येदेखील भरती वाढत आहे. म्युच्युअल फंड्स व ब्रोकरेज कंपन्या आपले अॅडव्हायझरी नेटवर्क वाढवत आहेत. फिनटेक कंपन्या पर्सनल फायनान्ससाठी टेक्नॉलॉजी व प्रोडक्ट टीम्स वाढवत आहेत. यामुळे कम्प्लायन्स आणि फ्रॉड डिटेक्शन रोल्सची मागणी वाढली आहे.

    Premium| Trump Tariff War: ट्रम्प यांच्या "धटिंगणशाही"ला भारत कसे सामोरे जाणार?

    इंश्युरन्स क्षेत्रात डिजिटल अंडररायटर्स, एआय-बेस्ड क्लेम स्पेशॅलिस्ट्स, फ्रॉड डिटेक्शन अॅनालिस्ट्स आणि डिजिटल अॅसेसर्स अशा रोल्समध्ये 6-9% वाढ झाली आहे. आयआरडीएआयच्या पॉलिसीजमुळे आणि टेक्नॉलॉजीला चालना मिळाल्याने या क्षेत्रात दरवर्षी 5-7% हायरिंग ग्रोथ होत आहे.

    FAQs

    Q1. 2030 पर्यंत किती नोकऱ्या निर्माण होणार आहेत?
    - अंदाजे 2.5 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या.

    Q2. कोणत्या क्षेत्रांमध्ये जास्त भरती होईल?
    - डिजिटल बँकिंग, कम्प्लायन्स, लोन अंडररायटिंग, इंश्युरन्स व फ्रॉड डिटेक्शन रोल्समध्ये.

    Q3. कोणत्या शहरांमध्ये सर्वाधिक मागणी आहे?
    - टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये.

    Q4. दरवर्षी हायरिंग ग्रोथ किती आहे?
    - साधारण 5% ते 10% पर्यंत.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.