लग्नानंतर नववधूने केलं भयानक कांड, पती हादरलाच ! मधुचंद्रांच्या रात्री तिने..
Tv9 Marathi August 22, 2025 11:45 PM

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यांनंतर एका पतीने पत्नीवर गंभीर आरोप पोलिसांत धाव घेतली आणि तिच्याविरुद्ध करत गुन्हा दाखल केला. लग्नाच्या रात्रीपासून त्याच्या पत्नीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत. जर तो प्रेमाने बोलला तर ती अनेक कारणं देते एवढंच नव्हे तर एकदा मी तिच्याशी शारीरिक संबंध राखण्याचा प्रयत्न केला असता, तिने माझ्या प्रायव्हेट पार्टवर जबर हल्ला केला, मला 7 टाके पडले असा आरोप पतीने केला. त्याचे हे आरोप ऐकून पोलिसही हैराण झालेत.

हे प्रकरण बिजनौरच्या मांडावर पोलीस ठाण्याचे आहे. येथे शिमला कला गावातील रहिवासी चांद वीर सिंग उर्फ ​​चांद यांनी मांडावर पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी तनुविरोधात करत तक्रार पत्र दिले. त्यात त्याने म्हटले की, 29 एप्रिल 2025 रोजी अलीपुरा जाट कोतवाली देहात परिसरातील तनुशी माझं (चांद) लग्न झालं. सुरुवातीपासूनच पत्नी तनु माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास कचरत होती. जेव्हा जेव्हा मी तिच्या जवळ जायचो, प्रेमसंबंध ठेवण्याबद्दल बोलायचे करायचा तेव्हा ती घरातील काही काम करण्याचे निमित्त करून खोलीतून निघून जायची. बऱ्याचदा ती फोनवर कोणाशी तरी गप्पा मारण्यात व्यस्त असायची आणि मी येताच फोन कट करायची.

काय म्हणाला पती ? 

पतीच्या म्हणण्यानुसार, 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता त्याने तनुसोबत शारीरिक संबंध राखण्याचा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला राग आला. तिने त्याच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केला. त्यामुळे त्याचा प्रायव्हेचट पार्ट दोन ठिकाणी कापला गेला. त्याचा आवाज आणि ओरडणं ऐकून त्याचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य धावत आले. रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला कसंबसं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टला 7 टाके घातले आणि त्याचा जीव वाचवला.

पत्नीनेही लावले गंभीर आरोप

चांदवीर सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मंदावर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार सरोज म्हणाले – चांदवीर सिंह यांच्या पत्नी तनु यांनीही त्यांच्यावर आरोप केले आहेत.
तिने पोलिसांना सांगितले की तिचे नुकतेच लग्न झाले आहे. ती जेव्हा जेव्हा तिच्या पालकांना फोन करायची तेव्हा तिचा नवरा चांदवीर हा तिच्यावर संशय घ्यायचा, त्याला वाटायचं की मी दुसऱ्या मुलाशी बोलत्ये, तो माझ्यावर संशय घ्यायचा असं तनूने तिच्या तक्रारीत सांगितलं. एवढंच नव्हे तर तो दररोज माझ्यावर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करायचा, त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा, प्रचंड अस्वस्थ वाटायचं त्याच रागातून मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला, असं तिने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी कारवाई करत आरोपी नववधू तनुला अटक केली. नवविवाहित सुनेचे हे भयानक कृत्य पाहून गावकरीही हादरले आहेत. याप्रकरणामुळे सध्या सगळीकडे चांद वीर आणि तनुची चर्चा होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.