Thane News : ठाण्यात इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला; २७ कुटुंबांचे स्थलांतर
Saam TV August 23, 2025 12:45 AM
  • ठाण्यातील किसन नगरातील पंचशील इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळला.

  • दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • २७ कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.

  • या घटनेने ठाण्यातील जुनी व जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

ठाण्यातील किसन नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील किसन नगर क्रमांक ३ मधील पंचशील इमारतीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील किसन नगर क्रमांक ३ मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पंचशील इमारतीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला. सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन दल, स्थानिक पोलीस व अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Thane Pod Taxi: ठाण्यातही पॉड टॅक्सी धावणार; भाडे फक्त ३० रुपये; प्रताप सरनाईकांची घोषणा

इमारतीत राहणाऱ्या सुमारे २७ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अनेक रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य आणि महत्त्वाच्या वस्तू इमारतीतच राहिल्याने त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

Thane News : संतापजनक! ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी, रिक्षामध्ये तरुणीला मारण्याचा प्रयत्न

एकूणच किसन नगरातील पंचशील इमारतीतील गॅलरीचा भाग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने ठाण्यातील जुनी, जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.