Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम
esakal August 23, 2025 04:45 AM

थोडक्यात:

  • हरतालिका व्रत हे विवाहित व अविवाहित स्त्रियांनी श्रद्धेने पतीच्या दीर्घायुष्य किंवा योग्य वरासाठी करतं.

  • हे व्रत उपवास, शिव-पार्वती पूजन, कथा वाचन व जागरण यासह साजरं केलं जातं.

  • गर्भवती, अस्वस्थ व औषधोपचारात असलेल्या महिलांनी उपवास टाळून फक्त पूजा करावी.

  • Who Should Do Hartalika Vrat: अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरतालिका व्रत यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जाणार आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपवासासह पूजा करतात.

    पण नेमकी ही पूजाकोणी करावी आणि कोणी करू नये? तसेच, या व्रताचे नियम काय आहेत? याबाबत अनेकांना संभ्रम असतो. चला तर मग, याचे संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेऊया.

    Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना हरतालिका व्रताचे महत्त्व

    पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केलं. तिच्या अटळ श्रद्धा आणि संयमामुळेच शंकरांनी तिला स्वीकारलं. म्हणूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते.

    शुभ मुहूर्त

    पंचांगानुसार, यावर्षी २६ ऑगस्ट २०२५ सकाळी ५:५६ ते ८:३१ या वेळेत, म्हणजेच सुमारे अडीच तासांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे.

    हरतालिका व्रत कोणी करावे? 1. सुवासिनी स्त्रिया (विवाहित महिला)

    या व्रताचा उद्देशच पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणे असल्यामुळे, विवाहित स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करणे उचित मानले जाते.

    2. कुमारिका (अविवाहित मुली)

    अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात. देवी पार्वतीप्रमाणे त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हावा, या इच्छेने त्या हे व्रत करत असतात.

    3. श्रद्धाळू महिला

    ज्या स्त्रिया अध्यात्मिक श्रद्धेने शंकर-पार्वतीची पूजा करतात, त्या वय किंवा वैवाहिक स्थितीची अट न बाळगता हे व्रत करू शकतात.

    Eco-friendly Ganpati: बाप्पांची मूर्ती बनवा स्वतःच्या हातांनी; इको-फ्रेंडली गणपतीसाठी तयारी सुरू करा आजपासून! हरतालिका व्रत कोणी करू नये? 1. गर्भवती महिला

    या दिवशी उपवास खूप कठोर असतो. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करावे किंवा वर्ज्य करावे.

    2. अस्वस्थ किंवा औषधोपचारात असलेल्या महिला

    अशा महिलांनी उपवास न करता केवळ पूजा करून भाविकतेने दिवस साजरा करावा.

    3. ज्यांना वैद्यकीय कारणास्तव उपवास करता येत नाही

    त्यांनी उपवास न करता, फळाहार करून किंवा मानसिक भक्तीने व्रत पार पाडावे.

    हरतालिका व्रताचे मुख्य नियम

    1. उपवासाचे पालन

    काही महिला निर्जळी उपवास करतात (पाणीही न घेता), तर काही फळाहार करतात. उपवासाची पद्धत स्वतःच्या आरोग्यानुसार ठरवावी.

    2. हरतालिका व्रताच्या आदल्या दिवशी संकल्प घ्यावा

    पूजेसाठी लागणारी सामग्री आधीच गोळा करावी.

    3. मूर्ती स्थापना व पूजा

    भगवान शिव व पार्वतीची मूर्ती स्थापन करून त्यांना गंध, फुले, बेलपत्र, दुर्वा, नैवेद्य इत्यादी अर्पण करावं.

    4. हरतालिका कथाच वाचन/ऐकणे

    पारंपरिक हरतालिका व्रतकथा ऐकणे अत्यावश्यक मानले जाते.

    5. रात्रभर जागरण

    काही ठिकाणी स्त्रिया रात्रभर भजन-पूजन करून जागरण करतात.

    6. दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण

    सूर्योदयानंतर किंवा ठराविक मुहूर्तावर व्रत पारण (उपवास सोडणे) केले जाते.

    FAQs

    1. हरतालिका व्रत कोणासाठी आहे? (Who should observe Hartalika Vrat?)

    विवाहित स्त्रिया पतीसाठी आणि अविवाहित मुली योग्य वरासाठी हे व्रत करतात.

    2. गर्भवती महिला हे व्रत करू शकतात का? (Can pregnant women observe Hartalika Vrat?)

    गर्भवती महिलांनी उपवास न करता, डॉक्टरांचा सल्ला घेऊन फक्त पूजन करावं.

    3. हरतालिका व्रताच्या दिवशी उपवास कसा असतो? (What kind of fasting is done on Hartalika Vrat?)

    काहीजणी निर्जळी उपवास करतात, तर काही फळाहार करतात आरोग्यानुसार पद्धत निवडावी.

    4. हरतालिका व्रताची कथा का ऐकावी लागते? (Why should the Hartalika Vrat story be heard or read?)

    व्रत पूर्ण होण्यासाठी आणि धार्मिक फल प्राप्तीसाठी पारंपरिक कथा ऐकणे आवश्यक असते.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.