Wakefit launches Sleep Internship 2025 – get paid up to ₹10 lakh for sleeping 9 hours daily on new mattresses : ऑफीसमध्ये काम करताना अनेकांना झोप येते. अशावेळी काम बाजुला ठेऊन थोडं झोपावं, अशी तीव्र इच्छा होते. मात्र, कामाच्या ताणामुळे ते शक्य होत नाही. पण एखाद्या नोकरीत जर झोपणे हे एकमेव काम असेल तर? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कारण एका कंपनी भन्नाट इंटर्नशिप प्रोग्राम सुरु केला आहे. यात तुम्हाला दिवसाला ९ तास झोपायचा रग्गड पगार मिळणार आहे.
भारतातील गादी बनवणारी कंपनी वेकफिटने त्यांचा स्लीप इंटर्नशिप प्रोग्रामचा जाहीर केला आहे. अशाप्रकारे ऑफर सुरु करण्याचं त्याचं हे पाचवं वर्ष आहे. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना वेकफिटच्या नव्या गाद्यांवर दररोज 9 तास झोपावं लागणार आहे. इतकंच नाही, तर त्यांतर तुम्हाला त्या गाद्यांचा अनुभवही कंपनीला सांगावा लागणार आहे.
किती मिळणार पैसे?आता प्रश्न असा आहे की, दिवसभरात नऊ तास झोपायचं कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार आहे, तर यासंदर्भात कंपनीने स्पष्ट सांगितलंय की, या प्रोग्राममधील इंटर्न्सना जवळपास 10 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. म्हणजेच, तुम्ही जितकं चांगलं झोपाल, तितकं तुमचा पगार जास्त असणार आहे. वेकफिट असा प्रयोग पहिल्यांदाच करतेय असं नाही. गेल्या चार वर्षांपासून कंपनीकडून हा इंटर्नशीप प्रोग्राम सुरु आहे. यामाध्यमातून अनेकांनी रग्गड पैसा कमावला आहे.
Big Sleep : गुगलच्या AI Agent ची कमाल! सायबर अटॅक होण्याआधीच त्याला थांबवलं, तुम्हीपण 'असं' वापरू शकता हे तंत्रज्ञान.. कोण करू शकतं अर्ज?जर तुम्हालासुद्धावाटतं असेल की तुम्ही इतका वेळ झोपू शकता, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. कंपनीने ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी किमान वयोमर्यादा २२ वर्ष असणं गरजेचं आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला गुगलवर "Wakefit Sleep Internship" असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथे "Apply Now" असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून एक अर्ज भरायचा, ज्यात तुम्हाला माहिती भरावी भरावी लागणार आहे.
इंटर्नशिपची वैशिष्ट्यंया इंटर्नशिपमध्ये सहभागी होताना तुम्हाला कोणत्याही ऑफीसमध्ये जाण्याची गरज नाही. तुमच्या घरातील गादीवर तुम्हाला झोपावं लागणार आहे. त्यासाठी कंपनीकडून तुम्हाला मोफत गादी आणि ट्रॅक 8 नावाचं कॉन्टॅक्टलेस स्लीप ट्रॅकर मिळणार आहे. ते तुमच्या झोपेची गुणवत्ता तपासणार आहे.
Sleep Tourism Destinations: फिरा… पण झोपेसाठी! जाणून घ्या भारतातील 5 सुंदर 'स्लीप टुरिझम' डेस्टिनेशन्सया इंटर्नशिपचा कालावधी 45-60 दिवसांचा असून यासाठी निवडलेल्या 10-20 उमेदवारांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच विजेत्याला जवळपास 10 लाखांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. यासाठी उमेदवाराचं वय 22 वर्षांपेक्षा जास्त असावं, तो भारतीय नागरिक आणि भारतात राहणारे असावा, वेकफिटच्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक किंवा व्यावसायिक संबंध असलेले व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत. झोपेची आवड आणि 8-9 तास सलग झोपण्याची क्षमता असावी, पात्रता निषक कंपनीने जाहीर केलं आहेत.