Ganesh Chaturthi 2025 : घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवणार असाल तर या चुका टाळा
Tv9 Marathi August 23, 2025 07:45 AM

हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवाचं विशेष महत्त्व आहे. हा सण गणपतीला समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करण्यापूर्वी आधी गणपतीची पूजा करतात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असं म्हणतात. या दिवशी घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात. घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्यानंतर मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव असतो. महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तुम्ही जर तुमच्या घरात पहिल्यांदाचं गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

हिंदू पंचागानुसार या वर्षी चतुर्थी तिथिची सुरुवात 26 ऑगस्टला दुपारी एक वाजून 54 मिनिटांनी होणार आहे, तर समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून 44 मिनिटांनी होणार आहे, अशा स्थितीमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी शुभमुर्हूत आहेत. यंदा 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे.

घरात कोणती मूर्ती आणावी?

तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गणपतीची मूर्ती घेण्यासाठी जाल तेव्हा तिच्या सोंडीकडे आवश्य लक्ष द्या, गणपतीची सोंड डावीकडे आहे की उजवीकडे ते पाहा. हिंदू धर्मशास्त्रानुसार डाव्या सोंडीच्या गणपतीचीच मुर्ती गणेशोत्सव काळात घरात स्थापन करावी.

मूर्ती घेताना गणपतीची मूर्ती उभी आहे की, बसलेली आहे? त्याकडे लक्ष द्या. घरात गणपतीची बसलेली मूर्ती आणणं शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात, सुख, समृद्धी येते.

गणपतीची मूर्ती घेताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गणपतीच्या एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक अशाच मूर्तीची शक्यतो निवड करा, अशी मूर्ती शुभ मानली जाते.

गणपतीच्या मूर्तीची स्थापन करताना ती ईशान्य दिशेला करा, तिचं तोडं हे उत्तर दिशेला ठेवा, घरी मूर्ती आल्यानंतर तिची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाची आरती करा. जर दोन्ही वेळेला शक्य नसेल तर कमीत कमी सकाळी तरी आरती कराच, गणपती बाप्पााच्या कृपेनं तुमची भरभराट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.