खल्वायनच्या संगीत सभेत सौ. मधुवंती देव यांचे गायन
esakal August 23, 2025 07:45 AM

-rat२१p४.jpg-
२५N८६०१२
रत्नागिरी ः संगीत मैफलीत गायन करताना मधुवंती देव. शेजारी तबल्यावर प्रथमेश शहाणे, हार्मोनिअमवर चैतन्य पटवर्धन, तानपुरा व स्वरसाथीला डॉ. तेजस्विनी प्रभुदेसाई आणि देवयानी केसरकर.
-------
संगीतसभेत मधुवंती देव यांचे गायन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः येथील खल्वायन संस्थेची ३१६वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात झाली. ही मैफल (कै.) अॅड. प्रसाद महाजनी स्मृती आणि (कै.) श्रीधर (बंडा) आगाशे स्मृती मासिक संगीतसभेच्या निमित्ताने साजरी करण्यात आली.
संगीतसभेत किराणा, ग्वाल्हेर तसेच जयपूर-अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका व गुरू मधुवंती देव (पुणे) यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भक्तिगीतांचे सादरीकरण झाले. त्यांनी राग सूरमल्हारामधील ‘गरजत आये बादरिया’ हा बडा ख्याल विलंबित तीनतालात सादर करत मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर ‘बरखा रितू बैरी हमारे’ ही बंदिश मध्यम लयीत सादर केली. राग बागेश्रीतील ‘अब घर आजा’ (रूपक ताल), खमाज रागातील ठुमरी ‘कोयलियाँ कूक सुनावे’ आणि शेवटी भैरवीतील ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाने मैफलीची रंगतदार सांगता केली. त्यांना हार्मोनिअमवर चैतन्य पटवर्धन आणि तबल्यावर प्रथमेश शहाणे यांची उठावदार साथ लाभली. तानपुरा व स्वरसाथ देव यांची शिष्या तेजस्विनी प्रभुदेसाई आणि देवयानी केसरकर यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.