GST Relief: नवीन GST नियमांमुळे घर खरेदी करणे स्वस्त होणार; कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
esakal August 23, 2025 07:45 AM
  • सरकार घर खरेदी आणि बांधकाम स्वस्त करण्यासाठी जीएसटी दर कमी करण्याचा विचार करत आहे.

  • सिमेंट, स्टील, पेंट यांसारख्या मटेरियलवर कर कमी झाल्यास प्रोजेक्ट खर्च आणि घराची अंतिम किंमत कमी होईल.

  • याचा सर्वात मोठा फायदा मध्यमवर्गीय घरखरेदीदारांना होणार असून लक्झरी घरांवर उलटा परिणाम होऊ शकतो.

GST Rates on Construction Materials: घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे घर बांधणे आणि खरेदी करणे दोन्ही स्वस्त होऊ शकते. सध्या घर बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट, स्टील, टाइल्स, पेंट यांसारख्या मटेरियलवर वेगवेगळ्या दराने जीएसटी आकारला जातो. उदाहरणार्थ, सिमेंट आणि पेंटवर तब्बल 28% तर स्टीलसारख्या वस्तूंवर 18% जीएसटी आहे. यामुळे प्रोजेक्टची एकूण किंमत वाढते आणि त्याचा फटका थेट ग्राहकांना बसतो.

कर कपातीचा फायदा ग्राहकांना

जर सरकारने GST कमी करण्याचा निर्णय घेतला, तर बिल्डरची बांधकाम लागत घटेल आणि त्याचा फायदा थेट घर खरेदीदारांना होईल. त्यामुळे नव्या घरांची किंमत कमी होऊ शकते आणि मिडल क्लासला दिलासा मिळू शकतो.

Job Growth: नोकरीचं टेन्शन संपलं! 2030 पर्यंत या क्षेत्रात 2.5 लाख नोकऱ्या निर्माण होणार किफायतशीर घरांवर मर्यादित परिणाम

सध्या ‘अफॉर्डेबल हाऊसिंग’ प्रोजेक्ट्सवर फक्त 1% जीएसटी लागू आहे, त्यामुळे मोठा बदल होणार नाही. मात्र, ITC (Input Tax Credit) लागू झाल्यास बिल्डरच्या खर्चात काही प्रमाणात कपात होईल आणि त्याचा फायदा ग्राहकांनाही मिळू शकतो.

बांधकाम खर्चात प्रचंड वाढ

2019 ते 2024 दरम्यान बांधकाम खर्च तब्बल 40% ने वाढला आहे. केवळ 3 वर्षांतच 27% पेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे जर सिमेंट आणि स्टीलवरील जीएसटी कमी झाला, तर बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदारांनामोठा दिलासा मिळू शकेल.

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत मध्यमवर्गीयांना सर्वाधिक फायदा

महागाईमुळे त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना हा बदल मोठा दिलासा देणारा ठरू शकतो. कमी करामुळे घराची अंतिम किंमत कमी होईल, तसेच EMIचं ओझं हलकं होऊ शकतं.

लक्झरी घरांवर उलट परिणाम?

मध्यम आणि किफायतशीर घरांना फायदा होईल, तर लक्झरी प्रोजेक्ट्ससाठी ही नवी व्यवस्था उलट नुकसानदायक ठरू शकते. महागड्या इम्पोर्टेड मटेरियल किंवा फिनिशिंग आयटम्सना जास्त कर श्रेणीत टाकल्यास, बिल्डर्सना किंमती वाढवाव्या लागतील किंवा नफा कमी करावा लागू शकतो.

FAQs

प्रश्न 1: सरकार जीएसटीमध्ये काय बदल करू शकते?
- बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट, स्टील, पेंट यांसारख्या मटेरियलवरील कर कमी केले जाऊ शकतात.

प्रश्न 2: कोणाला सर्वाधिक फायदा होईल?
- मध्यमवर्गीय घर खरेदीदारांना. कारण घराची किंमत आणि EMI कमी होऊ शकतो.

प्रश्न 3: अफॉर्डेबल हाऊसिंगवर काय परिणाम होईल?
- मोठा बदल नाही, कारण आधीच 1% जीएसटी लागू आहे, पण ITC लागू झाल्यास थोडा फायदा मिळू शकतो.

प्रश्न 4: लक्झरी घरांवर कसा परिणाम होईल?
- महागड्या मटेरियलवर जास्त कर लागू झाल्यास लक्झरी घरांची किंमत वाढू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.